Agra Suicide Video: धावत्या रेल्वे समोर तरुणीने मारली उडी, भयावह घटना CCTV कैद, आग्रा येथील घटना (Watch Video)
Agra Suicide News pc TWIITTER

Agra Suicide Video: उत्तर प्रदेशातील आग्रा येथे राजा की मंडी रेल्वे स्थानकावर धक्कादायक प्रकार घडला आहे. प्लॅटफॉर्मवर बसलेल्या एका तरुणीने सोमवारी सकाळी धावत्या ट्रेनसमोर उडी मारली आहे. ही घटना रेल्वेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. तरुणीने ट्रेनसमोर उडी मारल्याने रेल्वे स्थानकावर खळबळ उडाली होती. तेथे प्रयत्यदर्शीनी सांगितले की, घटनेपूर्वी तरुणी आणि तिच्या बॉयफ्रेंडमध्ये जोरदार भांडण सुरु झालं होतं. (हेही वाचा- मेट्रो स्टेशनवर चालत्या ट्रेनसमोर तरुणाची उडी, पीडितेचा मृत्यू, व्हिडिओ समोर

मिळालेल्या माहितीनुसार, तरुणी आणि तिचा बॉयफ्रेंड राजा की मंडी रेल्वे स्थानकावर बसले होते. दोघांंमध्ये भांडण सुरु झाल आणि तरुणीने रागाच्या भरात समोर येणाऱ्या रेल्वे  समोर  येताच रेल्वे रुळावर उडी मारली.ही घटना सोमवारी 11.30 वाजता घटते.  रेल्वे पीडित तरुणीच्या अंगावरून गेली. या घटनेची माहिती  रेल्वे सुरक्षा दलाला मिळतात, घटनास्थळी पोहचे आणि गंभीर जखमी तरुणीला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

तरुणी आणि तिचा बॉयफ्रेंड एकाच बाकावर बसलेले असतात. अचानक तरुणी रागाच्या भरात निघून रेल्वे रुळावर उडी मारते. आग्रा कॅंटहून नवी दिल्लीला जाणाऱ्या केरळ एक्स्प्रेसने तरुणीला चिरडले.  तरुणीचे नाव भारती  आणि पुरुषाचे नाव प्रिन्स आहे अशी माहिती आरपीएफने दिली आहे. भरधाव ट्रेनने चिरडल्यानंतर तरुणी गंभीर जखमी होते. घटनेमुळे रेल्वे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेवरून असे दिसत आहे की, तरुणी आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात होती. अधिक माहितीसाठी आरपीएफ आणि पोलिस यांची चौकशी करत आहे.तरुणीची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.