Delhi Suicide Video: मेट्रो स्टेशनवर चालत्या ट्रेनसमोर तरुणाची उडी, पीडितेचा मृत्यू, व्हिडिओ समोर
Delhi Suicide Video PC twitter

 Delhi Suicide Video: दिल्लीतून (Delhi) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्लीच्या INA मेट्रो स्टेशनवर चालत्या ट्रेनसमोर एका तरुणाने उडी मारून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेचा व्हीडिओ जवळच असलेल्या कॅमेरात कैद झाला आहे. अनेक लोक मेट्रो स्टेशनवर उपस्थित त्या व्यक्तीने ट्रॅकवर उडी मारल्याची व्हिडिओत दिसत आहे. ही घटना शनिवारी 27 जानेवारी सकाळी 7.38 च्या सुमारास घडसी. (हेही वाचा- धनगर आरक्षण मुद्द्यावरुन तरुणाची आत्महत्या; रेल्वेखाली उडी घेत संपवलं आयुष्य)

मिळालेल्या माहितीनुसार, 27 जानेवारी रोजी समयपूर बदलीच्या दिशेने जाणाऱ्या मेट्रो मार्गावर गर्दीच्या वेळेत तरुणाने भरधावत्या मेट्रोसमोर उडी मारली आहे. या घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर दिल्ली पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर रेल्वे ट्रॅकवर त्या व्यक्तीचा मृतदेह सापडला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पोलिस या संदर्भात तपास करत आहे. तरुणाने ट्रेन प्लॅटफॉर्मवर आलेल्या ट्रेन समोर उडी का मारली याचा शोध पोलिस घेत आहे. इतर प्रवाशांना या घटनेचा आश्चर्य वाटू लागले. प्रवाशांनी घटनास्थळी धाव घेतले परंतु वेळ निघून गेली आणि ट्रेन तरुणाच्या अंगावरून गेली काही काळ प्लॅटफॉर्मवर गोंधळ निर्माण झाला.