Death | Image only representative purpose (Photo credit: pixabay)

Suicide News: गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यात मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणावरून वाद पेटला आहे. मराठा आरक्षणासाठी अनेक तरुणांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळत होती. दरम्यान धनगर आरक्षणासाठी तरुणाने आत्महत्या करून जीवनयात्रा संपवली आहे. लातूरमधील एका  धनगर समाजातील तरुणाने रेल्वे रुळासमोर उडी घेत आत्महत्या केली. मृतदेहाजवळ पोलिसांना सुसाईट नोट सापडली, ज्यात त्याने आत्महत्या केल्याचे कारण लिहले  होते. या घटनेनंतर गावात मोठी खळबळ उडाली.  (हेही वाचा- अकोला येथील 19 वर्षीय तरुणाची आत्महत्या, मराठा आरक्षणाची मागणी करत टोकाचे पाऊल)

मिळालेल्या माहितीनुसार, लातूर जिल्ह्यातील आष्टी गावात ही घटना घडली.तेथील रहिवासी रमेश चंद्रकांत फुले ३६ असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. घरदार संभाळण्यासाठी तो दुसऱ्यांच्या शेतात मजूरीसाठी जायचा. सत्तेत आल्यानंतरही धनगर समाजाका आरक्षण मिळाले नाही. धनगर समाजाकडे सरकार दुर्लक्ष करताना दिसत आहे. धनगर समाजाला आरक्षण मिळाल्यावर तरुणांना आरक्षण मिळेल असं त्याला नेहमी वाटायचं. धनगर समाजाला आरक्षण मिळत नसल्याने त्याने आत्महत्या केल्याचे समोर आले.

तरुणाने आत्महत्या केल्याची माहिती गावात पसरताच, पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. रमशेचा मृतदेह ताब्यात घेऊन प्राथमिक केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. या घटनेनंतर गावात मोठी खळबळ उडाली. कुटुंबावर दुखाचे डोंगर कोसळला आहे. मयत रमेश यांच्या पाश्चाता पत्नी, दोन मुली, मुलगा, आई- वडील, भाऊ- भावजय, पुतणे असा परिवार आहे. जोपर्यंत नोकरीचे लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका मयत रमेश फुले यांच्या नातेवाईकांनी घेतली आहे.