Cylinder Blast in Ghaziabad: गाझियाबादमधील लोणी येथील बबलू गार्डनमध्ये आज सकाळी गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने घर कोसळले. याच दोन मुलांसह तिघांचा मृत्यू झाला आहे. पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले असून ते मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहेत. प्राप्त माहितीनुसार, मुनीर यांचे लोणीच्या बबलू गार्डनमध्ये दुमजली घर आहे. मुनीर हे पत्नी, चार मुले, दोन सुना आणि मुलांसह येथे राहत होते. ते लोणीमध्येच ऑटो मेकॅनिक आणि एम्ब्रॉयडरीचे काम करतात. आज सकाळी साडेदहाच्या सुमारास जेवण तयार केले जात होते.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गॅस गळतीमुळे सिलिंडरला आग लागली. यानंतर गॅस सिलिंडरचा जोरात स्फोट झाला. यामुळे घराची पडझड होऊन अनेक लोक त्यात गाडले गेले. ढिगाऱ्याखालून पाच जणांना बाहेर काढण्यात आले आहे. लहान मुलांसह तिघांचा मृत्यू झाला आहे. (हेही वाचा - Jammu-Kashmir: काश्मीरमधील शोपियानमध्ये जैश ए मोहम्मदच्या 3 दहशतवाद्यांना कंठस्नान)
अपघातग्रस्त मुनीर आणि त्यांचा एक मुलगा घराबाहेर पडले होते. घरात महिला आणि लहान मुले होती. अग्निशमन दल, पोलीस आणि नगरपरिषदेचे पथक घटनास्थळी पोहोचले असून मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहेत. घटनास्थळी जेसीबीने ढिगारा हटवून अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. घटनास्थळी लोकांची गर्दी जमली आहे.
Ghaziabad, Uttar Pradesh | Three people dead, five injured in house collapse due to cylinder blast, in Bablu Garden area of Loni pic.twitter.com/KX6YE6ipzV
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) October 5, 2022
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ढिगाऱ्याखाली दबून 24 वर्षीय महिला, 15 वर्षांची आणि 10 महिन्यांची दोन मुले मरण पावली. जखमींना जीटीबी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गाझियाबादमध्ये यापूर्वीही गॅस सिलेंडर स्फोट झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.