Jammu-Kashmir: जम्मू-काश्मीर (Jammu-Kashmir) मधील शोपियानमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये (Terrorists) चकमक (Encounter) सुरू आहे. या चकमकीत सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. शोपियांच्या द्राचमध्ये जैश-ए-मोहम्मद (Jaish-e-Mohammed) चे 3 दहशतवादी ठार झाले आहेत. दहशतवादी लपल्याची खबर सुरक्षा दलाला मिळाली होती. परिसराला वेढा घातल्यानंतर दहशतवाद्यांकडून गोळीबार झाला, ज्याला प्रत्युत्तर म्हणून सुरक्षा दलांनीही गोळीबार केला आणि तीन दहशतवाद्यांना लक्ष्य केले.
एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, दक्षिण काश्मीरमधील द्राच भागात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली. परिसरात लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला, तेव्हा शोधमोहिमेचे चकमकीत रूपांतर झाले. दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. (हेही वाचा -Uttarakhand Avalanche: उत्तराखंडमध्ये हिमस्खलन, 10 गिर्यारोहकांचा मृत्यू, शोधमोहीम अद्यापही सुरुच)
एडीजीपी काश्मीर विजय कुमार यांनी सांगितले की, मारले गेलेले दहशतवादी हनान बिन याकूब आणि जमशेद अलीकडेच पुलवामामधील पिंगलना येथे 2 ऑक्टोबर रोजी एसपीओ जावेद दार यांच्या हत्येत सामील होते. यासोबतच 24 सप्टेंबर रोजी पुलवामा येथे पश्चिम बंगालमधील एका बाहेरील मजूराच्या हत्येतही या दोघांचा सहभाग होता.
J-K: 3 Jaish-e-Mohammed terrorists neutralised in encounter in Shopian
Read @ANI Story | https://t.co/aRWPas5BYF#JammuAndKashmir #Shopian #Encounter #Securityforces pic.twitter.com/jtHzKCXmxb
— ANI Digital (@ani_digital) October 5, 2022
एका अधिकाऱ्याने सांगितले की, सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकाने संशयित जागेला वेढा घातताच तेथे लपलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. अमित शहा श्रीनगरला पोहोचल्यानंतर काही तासांनी ही चकमक झाली. तत्पूर्वी त्यांनी राजौरी येथे जाहीर सभेला संबोधित केले होते.