Lok Sabha Session 2024 प्रतिकात्मक प्रतिमा (फोटो सौजन्य - X/@DDNewslive)

Lok Sabha Session 2024: 18 व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन (First session of 18th Lok Sabha) उद्यापासून सुरू होणार आहे. लोकसभेचे (Lok Sabha) कामकाज सकाळी 11 वाजता सुरू होईल. सोमवारी लोकसभा अधिवेशना (Lok Sabha Session 2024) दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह (Prime Minister Modi) नवनिर्वाचित खासदार शपथ घेतील. प्रोटेम स्पीकर भर्त्रीहरी महताब (Pro Tem Speaker Bhartruhari Mahtab) त्यांना शपथ देतील. त्यानंतर लोकसभा अध्यक्षांची निवड होईल. तसेच दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) संबोधित करतील.

पीएम मोदींच्या मंत्रिमंडळात समाविष्ट करण्यात आलेल्या मंत्र्यांमध्ये 58 लोकसभेचे सदस्य आहेत. केंद्रीय मंत्रिपरिषदेचे 13 सदस्य राज्यसभेचे खासदार आहेत आणि एक मंत्री, रवनीत सिंग बिट्टू हे कोणत्याही सभागृहाचे सदस्य नाहीत. लुधियानामधून त्यांनी भाजपच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली, पण त्यांचा पराभव झाला. पीएम मोदी आणि त्यांच्या मंत्र्यांनंतर राज्यनिहाय खासदारांना शपथ दिली जाईल. संसदेच्या या अधिवेशनात शून्य तास आणि प्रश्नोत्तराचा तास असणार नाही. (हेही वाचा -Pro-tem Speaker of Lok Sabha: लोकसभेचे सदस्य Bhartruhari Mahtab यांची प्रोटेम स्पीकर म्हणून नियुक्ती)

27 जून रोजी होणार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे अभिभाषण -

24 जून रोजी संसदेच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 280 नवनिर्वाचित खासदार शपथ घेणार आहेत. दुसऱ्या दिवशी म्हणजे 25 जून रोजी 264 नवनिर्वाचित खासदार शपथ घेतील. त्यानंतर 26 जून रोजी लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. 27 जून रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करणार आहेत. 28 जून रोजी, सरकार राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा करेल.

2 जुलै रोजी पंतप्रधान मोदी लोकसभेला संबोधित करणार -

राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 जुलै रोजी लोकसभेला संबोधित करणार आहेत. ते 3 जुलै रोजी राज्यसभेत बोलणार आहेत. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी 20 जून रोजी सांगितले होते की, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कटक, ओडिशा येथील भाजप खासदार भर्त्रीहरी महताब यांची प्रोटेम स्पीकर म्हणून नियुक्ती केली आहे. याशिवाय, राष्ट्रपातींनी सुरेश कोडीकुन्नील, थालिकोट्टाई राजुतेवार बाळू, राधा मोहन सिंग, फग्गन सिंग कुलस्ते आणि सुदीप बंदोपाध्याय यांना अध्यक्ष निवडीपर्यंत प्रो टेम स्पीकरला मदत करण्यासाठी नियुक्त केले आहे. (हेही वाचा -Sheikh Hasina India Visit: 2 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेल्या शेख हसीना यांचे पंतप्रधान मोदींकडून खास स्वागत; राजघाटावर महात्मा गांधींना वाहिली श्रद्धांजली)

संसदेच्या कनिष्ठ सभागृहात म्हणजेच लोकसभेत भाजपला सभापतीपद मिळण्याची शक्यता आहे, तर उपसभापतीपद एनडीएच्या मित्रपक्षांपैकी एकाला दिले जाऊ शकते. I.N.D.I.A. ब्लॉकने उपसभापती पदाची मागणी केली आहे, जे परंपरेने नेहमी विरोधकांकडे जाते. मात्र, 17 व्या लोकसभेत एकही उपसभापती नव्हता.