Farmer's Protest: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 27 डिसेंबरला असणारी  'मन की बात' संपेपर्यंत प्रत्येकाने थाळ्या वाजवाव्यात,  शेतकरी संघटनेचे आवाहन
Farmer's Protest (Photo Credits-ANI)

Farmer's Protest:  देशभरात कृषी कायद्याच्या विरोधात गेल्या 20 दिवसांहून अधिक दिवस उलटले तरीही आंदोलन सुरुच आहे. तर शेतकऱ्यांनी आमच्या मागण्यांवर लवकरात लवकर योग्य तो निर्णय सरकारने घ्यावा अशी वारंवार मागणी केली जात आहे. तर येत्या 25 डिसेंबरला माजी पंतप्रधान अटल बिहापी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांसोबत बातचीत करणार आहेत. याच पार्श्वभुमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दूरचित्रवाणी वरील कार्यक्रम मन की बात आयोजित करण्यात आला आहे. परंतु मन की बात संपेपर्यंत प्रत्येकाने थाळ्या वाजवाव्यात असे आवाहन शेतकरी संघटनेकडून करण्यात आले आहे.(Farmers' Protest: सिंघू बॉर्डरवर संत बाबा राम सिंह यांची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या)

जगजित सिंह डालेवाला यांनी पुढे असे ही म्हटले की, हरियाणा येथील सर्व टोला प्लाझा येत्या 25 डिसेंबर पासून ते 27 डिसेंबर पर्यंत फ्री करणार आहेत. त्याचसोबत येत्या 23 डिसेंबरला किसान दिवस साजरा केला जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी या दिवशी अन्नत्याग करावा असे आवाहन भारतीय किसान युनियनचे राकेश टिकैत यांनी म्हटले आहे.(Farmers Protest: कृषी कायद्याविरोधाच दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचा आज 25 वा दिवस)

Tweet:

दरम्यान, कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्यांकडून आंदोलन केले जात आहे. केंद्र सरकारसोबत अनेक बैठका होऊनसुद्धा अजून यावर समाधानकारक तोडगा निघालेला नाही. या आंदोलनात आतापर्यंत अनेक शेतक-यांच्या मृत्यू देखील झाला आहे. त्यामुळे आज या आंदोलनाच्या 25 व्या दिवशी शेतकरी आंदोलनात शहीद झालेल्या शेतक-यांसाठी श्रद्धांजली सभांचे आयोजन केले गेले. ही विधेयक रद्द करण्यात यावी या मागणीसाठी हे आंदोलन सुरु आहे.