
विमानप्रवास हा आरामदायी असल्याने तसेच सामान्यांच्या बजेटमध्ये आल्याने आता विमानप्रवाशांची संख्या वाढली आहे. भारतातील अनेक लहान लहान शहरं देखील आता विमानांनी जोडली जाऊ लागली आहेत. मात्र विमानतळांवर प्रवाशांना तपासणीसाठी चेकिंग सिस्टीम अधिक सुकर करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. लवकरच नव्या तंत्रज्ञानांमुळे ओळखपत्राऐवजी चेहरा स्कॅनिंगने बोर्डिंग पास दिले जाणार आहेत.
डिजी यात्रा सुविधा
भविष्यात केंद्र सरकारकारकडून बायोमेट्रिक सेल्फ बोर्डिंग टेक्नॉलॉजी सुरू करण्यात येणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम सुरूवातील बंगळूरू विमानतळावर सुरू होईल. त्यानंतर दिल्ली, मुंबई, हैदराबाद, , विजयवाडा, पुणे, कोलकाता या विमानतळांवरही सुरू करण्यात येणार आहे.
विशेष तंत्रज्ञानाचा वापर करून प्रवाशांचा चेहरा पाहून विमानतळावर प्रवेश आणि बोर्डिंग पास दिला जाणार आहे. नक्की वाचा : विमानप्रवासात आरोग्याच्या या '5' समस्यांकडे दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात !
कधी होणार सुरूवात
डिजी यात्रा हा भारतसरकारचा आगामी कार्यक्रम फेब्रुवारी 2019 पर्यंत सुरू होणार आहे. डिजी यात्राचा मुख्य उद्देश प्रवाशांचा प्रवास हा कागद रहित आणि कमीत कमी त्रासाचा व्हावा असा आहे.