online ((Photo Credits: Pexels)

UGC NET Exam 2021 ची अ‍ॅडमीट कार्ड्स (Admit Card) आज (8 नोव्हेंबर) जारी होण्याची शक्यता आहे. दरम्यान विद्यार्थ्यांना आज अ‍ॅडमीट कार्ड्स डाऊनलोड करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ ugcnet.nta.nic.in ला भेट द्यावी लागणार आहे. ही अ‍ॅडमीट कार्ड्स जारी झाल्यानंतर December 2020 आणि June 2021 ची अ‍ॅडमीट कार्ड्स मिळणार आहेत. यासाठी विद्यार्थ्यांना अ‍ॅप्लिकेशन नंबर आणि इअतर क्रेडेन्शिअल्स द्यावे लागणार आहेत. दरम्यान एनटीए कडून अद्याप कोणतीही तारीख किंवा वेळ देण्यात आलेली नाही.

युजीसी नेट परीक्षा यंदा नोव्हेंबर महिन्यात 20,21,22,24,25,26,29,30 तसेच डिसेंबर महिन्यात 1, 3, 4 आणि 5 तारखेला होणार आहे. अ‍ॅडमीट कार्ड वर विद्यार्थ्यांसाठी परीक्षेची तारीख, शिफ्ट, वेळ दिली जाणार आहे. UGC NET Exam 2021: एनटीए कडून डिसेंबर आणि जून सत्रातील परीक्षांच्या तारखांमध्ये बदल; nta.ac.in वर पहा अधिकृत नोटीस.

UGC NET 2021 अ‍ॅडमीट कार्ड कसं कराल डाऊनलोड?

  • अधिकृत संकेतस्थळ ugcnet.nta.nic.in ला भेट द्या.
  • होमपेज वर "UGC NET 2021" या अ‍ॅडमीट कार्ड लिंक वर क्लिक करा.
  • तुमचा अ‍ॅप्लिकेशन नंबर आणि जन्मतारीख टाका.
  • सबमीट वर क्लिक करा.
  • तुमच्या स्क्रीनवर युजीसी नेट अ‍ॅडमीट कार्ड दिसेल.
  • ते अ‍ॅडमीट कार्ड डाऊनलोड करून त्याची प्रिंटआऊट काढा.

अ‍ॅडमीट कार्ड वर दिलेल्या तारीख आणि वेळेप्रमाणेच विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जाणार आहे. यंदा कोविड मुळे युजीसीच्या परीक्षा तारखांमध्ये बदल करण्यात आले आहेत. ऑनलाईन घेतल्या जाणार्‍या या परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टिम नसेल. या परिक्षेचे दोन पेपर असतात. पहिला पेपर 50 गुणांचा आणि 100 प्रश्नांचा असतो तर दुसरा 200 मार्कांचा आणि 100 प्रश्नांचा असणार आहे.