UGC NET Exam 2021: एनटीए कडून डिसेंबर आणि जून सत्रातील परीक्षांच्या तारखांमध्ये बदल;  nta.ac.in वर पहा अधिकृत नोटीस
NTA (Pic Credit - NTA Twitter)

नॅशनल टेस्टिंग एजेंसी (National Testing Agency) अर्थात NTA कडून UGC NET Exam 2021 या डिसेंबर 2020 आणि जून 2021च्या नव्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. आता परीक्षेच्या नव्या तारखा NTA कडून त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर एक नोटिफिकेशनद्वारा जारी करण्यात आल्या आहेत. विद्यार्थी याकरिता nta.ac.in या संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. (नक्की वाचा: UGC-NET 2021: यूजीसी-नेट जून 2021परिक्षेच्या नोंदणी प्रक्रियेला सुरूवात, 'असा' कराल अर्ज).

ऑफिशिअल नोटीशी नुसार, एजेंसीला काही स्टुटंट कम्युनिटी कडून 10 ऑक्टोबरला इतर परीक्षा असल्याचं समजलं. ही परीक्षेची तारीख इतर परीक्षांसोबा क्लॅश होत असल्याने परीक्षा तारखेत बदल करण्यात आला आहे. अधिकाधिक विद्यार्थ्यांना नेट परीक्षेत सहभागी होता यावं यासाठी विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी UGC-NET December 2020 आणि June 2021 cycles मध्ये बदल करण्यात आले आहेत. सविस्तर डेटशीट लवकरच दिली जाणार आहे. सोबतच अधिकृत संकेतस्थळावरून विद्यार्थ्यांना अ‍ॅडमीट कार्ड्स देखील उपलब्ध करून दिली जाणार आहेत. इथे पहा नोटीस.

UGC NET रजिस्ट्रेशन 10 ऑगस्टपासून सुरू झाले असून आता 5 सप्टेंबर पर्यंत ते सुरू राहणार आहे. दरम्यान बाकी अधिक माहितीसाठी वेळोवेळी विद्यार्थ्यांना NTA UGC NETचं अधिकृत संकेतस्थळ पाहण्याचं आवाहन करण्यात आले आहे.

मागील दीड वर्षांपासून कोरोना संकटामुळे अनेक परीक्षा अनिश्चितकाळासाठी पुढे ढकलल्या गेल्या आहेत. आता हळूहळू कोरोनावर नियंत्रण मिळत असल्याने सुरक्षित वातावरणात आणि कोविड 19 नियमावलीचं पालन करून परीक्षांचं सत्र सुरू झालं आहे.