SBI PO Final Result 2021 जाहीर;  इथे पहा कसे पहाल तुमचे गुण
State Bank of India (SBI) | (Photo Credits: PTI/File)

स्टेट बॅंक ऑफ इंडिया (State Bank Of India)  कडून Probationary Officers (PO) Recruitment Exam 2021 चा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. नियुक्ती प्रक्रियेमध्ये 3 टप्प्यांमधून गेलेल्यांची अंतिम निकाल यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. मुलाखत दिलेल्या विद्यार्थ्यांना आता अधिकृत वेबसाईटवर निकाल पाहता येणार आहे. हा निकाल sbi.co.in वर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

फेब्रुवारी 2022 मध्ये मुलाखती घेण्यात आल्या होत्या. मुलाखत या या निकालामधील महत्त्वाचा टप्पा होता. हे देखील नक्की वाचा: Kisan Credit Card: आता कर्जाची चिंता होणार दुर, शेतकरी एसबीआयमार्फत किसान क्रेडिट कार्डसाठी करु शकतात अर्ज .

SBI PO 2021 चा अंतिम निकाल कसा पहाल?

  • sbi.co.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  • त्यानंतर करिअर्स पोर्टलला भेट द्या.
  • latest announcement सेक्शन मधून SBI PO exam ला निवडा.
  • अंतिम निकालाची लिंक निवडा.
  • निकालाच्या पीडीएफ मध्ये तुमचा रोल नंबर शोधा. निकाल पाहता येईल.

इथे पहा निकालाची डिरेक्ट लिंक.

बॅंकेकडून जारी केलेल्या निकालामध्ये उमेदवारांनी मुख्य परीक्षेमध्ये मिळवलेले मार्क्स देखील दाखवण्यात आले आहेत. याकरिता “marks secured in mains” च्या लिंकवर क्लिक करा. स्कोअरकार्ड पाहण्यासाठी तुमचा लॉगिन क्रेडेंशिअल एंटर करा.