Representational Image (Photo Credits: File Image)

NEET UG Result 2020:  देशभरातील प्रतिष्ठीत मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी घेतली जाणारी महत्त्वाची प्रवेश परीक्षा म्हणजे NEET. आज (16 ऑक्टोबर) मेडिकलच्या यंदाच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर केला आहे. 12 ऑक्टोबर दिवशी नॅशनल टेस्टिंग एजंसी (NTA) कडून यंदाचा National Eligibility cum Entrance Test (NEET) Result 2020, 16 ऑक्टोबरला जाहीर होईल असे सांगण्यात आले होते. हा निकाल अधिकृत संकेतस्थळावर म्हणजेच ntaneet.nic.in किंवा mcc.nic.in वर पाहता येणार आहे. दरम्यान एनटीए ने Final Answer keys of NEET(UG) 2020 जारी केली आहे.

आज विद्यार्थ्यांना त्यांच्या निकालामध्ये मार्क्स सोबतच NEET 2020 Rank List देखील पाहता येणार आहे. यामुळे त्यांना देशभरातील कोट्यातील त्यांचं स्थान पाहता येणार आहे. सर्वसामान्यपणे MBBS/BSD कोर्स साठी पात्र ठरताना नीट परीक्षेमध्ये किमान 50% गुण आवश्यक आहेत. आरक्षित वर्गाला किमान गुणांच्या यादीमध्ये वेगवेगळी कट ऑफ आहे.  मग तुमचे मार्क्स आणि रॅन्किंग कसे, कुठे पहाल ? हे जाणून घ्या इथे स्टेप बाय स्टेप

NEET 2020 Results कसा पहाल?

  • ntaneet.nic.in या एनटीएच्या अधिकृत स्थळाला भेट द्या.
  • त्यानंतर NEET result च्या होमपेजवरील निकालाच्या लिंक वर क्लिक करा.
  • तुमचा रोल नंबर, जन्मतारिख, Security Pin एंटर करून सबमीट करा.
  • तुमचा निकाल स्क्रिनवर उपलब्ध होईल.
  • यानंतर तुम्ही निकालाची प्रत डाऊनलोड करू शकता.

इथे पहा डिरेक्ट रिझल्ट पेजची लिंक .

नीट 2020 परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर तुम्हांला तो डाऊनलोड करण्यासाठी केवळ 90 दिवसांची मुभा असते. त्यामुळे वेळीच तुमच्या निकालाची प्रत डाऊनलोड करा. NEET 2020 Merit List: नीट युजी परीक्षा निकाल आणि AIR Merit List कशी पहाल ntaneet.nic.in वर ऑनलाईन.

COVID-19 संकटामध्येच यंदा NEET 2020 exams पार पडल्या आहेत. या परीक्षा 13 सप्टेंबरला झाल्या होत्या. मात्र ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा देणं कोविड 19 मुळे शक्य झाले नाही त्यांना 14 ऑक्टोबर दिवशी पुन्हा परीक्षा देण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली होती. 15.97लाख नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी सुमारे 85-90% विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे.