NEET Exam | Image Use For Symbolic Purposes Only | (Photo Credits: PixaBay)

वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय पदवी प्रवेशासाठी घेण्यात येणारी भारतातील राष्ट्रीय प्रवेश परीक्षेचा (National Eligibility cum Entrance Test (NEET)) निकाल आज (16 ऑक्टोबर) जाहीर केला जाणार आहे. एनटीएच्या अधिकृत वेबसाईट वर म्हणजेच ntaneet.nic.in वर निकाल जाहीर होणार आहे. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी आज सकाळेऐ विद्यार्थ्यांना निकालासाठी शुभेच्छा देताना त्याची माहिती दिली जाणार आहे. दरम्यान यंदा 13 सप्टेंबरला नीट युजी 2020 परीक्षा झाली होती. तर कोविड 19 मुळे जे विद्यार्थी परीक्षा देऊ शकले नाहीत त्यांच्यासाठी 14 ऑक्टोबरला पुन्हा परीक्षा आयोजित करण्यात आली होती. आता सार्‍या विद्यार्थ्यांचा निकाल आज दुपारी 4 वाजेपर्यंत हाती येणार आहे.

नीट परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर एनटीए कॅटेगिरीनुसार कट ऑफ स्कोअर जाहीर करेल, नीट परीक्षेची अंतिम आन्सर की जाहीर करणार आहे. विद्यर्थ्यांना आज निकालपत्रावर ऑनलाईन माध्यमातून मार्क्स सोबतच रॅन्किंग देखील पहायला मिळणार आहे. Engineering and Pharmacology Courses: महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रम प्रवेशासाठी गुणांची अट शिथिल, जाणून घ्या काय असतील नवे गुण

NEET 2020 Results कसा पहाल?

  • ntaneet.nic.in या एनटीएच्या अधिकृत स्थळाला भेट द्या.
  • त्यानंतर NEET result च्या होमपेजवरील निकालाच्या लिंक वर क्लिक करा.
  • तुमचा रोल नंबर, जन्मतारिख एंटर करून सबमीट करा.
  • तुमचा निकाल स्क्रिनवर उपलब्ध होईल.
  • यानंतर तुम्ही निकालाची प्रत डाऊनलोड करू शकता.

नीट 2020 परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर तुम्हांला तो डाऊनलोड करण्यासाठी केवळ 90 दिवसांची मुभा असते. त्यामुळे वेळीच तुमच्या निकालाची प्रत डाऊनलोड करा.