Uday Samant | (File Photo)

अभियांत्रिकी (Engineering) व औषधनिर्माणशास्त्र (Pharmacology) अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी पूर्वी असलेली गुणांची अट शिथिल करण्यात आली आहे. सुधारित गुणांच्या अटीनुसार पुढील प्रवेश होणार असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. श्री. सामंत म्हणाले, अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी बारावीला विज्ञान विषयांमध्ये (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित किंवा जीवशास्त्र), किमान 50 टक्के गुण मिळणे आणि प्रवेश पात्रता परीक्षा (CET)  देणे आवश्यक होते. आता खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना बारावीला 45 टक्के गुण पुरेसे ठरणार आहेत. तर राखीव गटांसाठी 40 टक्के गुण पुरेसे ठरणार आहेत.’

सामंत पुढे म्हणाले, अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या पात्रतेच्या निकषांमध्ये यंदा बदल करण्यात आल्यामुळे, प्रवेश प्रक्रियेमध्ये सुसूत्रता येण्यास मदत होणार आहे. बारावीचे पात्रता गुण पाच टक्क्य़ांनी कमी केले आहेत. याचा फायदा असंख्य विद्यार्थ्यांना होणार आहे.’ या निर्णयामुळे सीईटी परीक्षेमध्ये किमान एक गुण आणि बारावीला खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना किमान 45 टक्के गुण व मागासवर्गीय वर्गातील विद्यार्थ्यांना किमान 40 टक्के गुण असतील तर ते आता अभियांत्रिकी प्रवेशासाठी पात्र होऊ शकणार आहेत. (हेही वाचा: UGC ने जाहीर केली देशातील बनावट विद्यापीठांची यादी; उत्तर प्रदेश आणि दिल्लीमध्ये सर्वाधिक, See List)

दुसरीकडे, महाराष्ट्रात कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्गा दरम्यान वाढत असलेली प्रकरणे पाहता, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Education Minister Varsha Gaikwad) यांनी सांगितले की, राज्यात दिवाळीच्या (Diwali) आधी शाळा सुरु होणार नाहीत. परदेशात उच्च शिक्षण घेण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांची परिस्थिती भयानक आहे, कारण त्यांचे भविष्य शाळा-कॉलेज कधी सुरु होणार या निर्णयावर अवलंबून आहे. शैक्षणिक नुकसानीबाबत पालकांच्या चिंतेची दखल घेता यावी म्हणून, राज्य सरकार दोन किंवा तीन शैक्षणिक वर्षे एकत्र क्लब करू शकेल, अशी सूचना शिक्षण तज्ञ किशोर दराक यांनी केली आहे.