Central Board of Secondary Education कडून त्यांच्या यंदाच्या 10वी, 12वीच्या परीक्षेमध्ये अभ्यासक्रम 15% कपात केल्याच्या दाव्याचं खंडन केलं आहे. काही न्यूज आऊट्लेट्स कडून सीबीएससी बोर्डाने अभ्यासक्रम कमी केल्याचं म्हटलं आहे पण ही वृत्तं खोटी असल्याचं म्हटलं आहे. अहवालात बोर्डाचे प्रादेशिक अधिकारी विकास कुमार अग्रवाल यांचा हवाला दिला आहे, ते इंदूरमध्ये शाळेच्या मुख्याध्यापकांच्या 'ब्रिजिंग द गॅप' या परिषदेत बोलत होते.
CBSE ने एका नोटमध्ये म्हटले आहे की बोर्डाने अशी कोणतीही नोटीस जारी केली नाही किंवा मूल्यांकन प्रणाली किंवा परीक्षा धोरणात कोणतेही बदल केलेले नाहीत आणि बोर्डाच्या धोरणात्मक निर्णयांशी संबंधित माहिती केवळ बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटद्वारे किंवा अधिकृत चॅनेलद्वारे प्रकाशित केली जाते. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नये.
अद्याप सीबीएससी बोर्डाने परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केलेले नाही. लवकरच सीबीएससी बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट वर परीक्षेच्या तारखा लवकरच काहीर होणार आहेत. देशा परदेशात लाखो विद्यार्थी दरवर्षी सीबीएससी बोर्डाची 10वी, 12वीची परीक्षा देत असतात.
CBSE ने गेल्या काही महिन्यांत प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, 10वी आणि 12वीच्या 2025 च्या लेखी परीक्षा 15 फेब्रुवारी 2025 पासून सुरू होतील. अद्याप संपूर्ण CBSE डेटशीटची प्रतीक्षा आहे. त्याचप्रमाणे, 2024-25 शैक्षणिक सत्रासाठी प्रात्यक्षिक परीक्षा, प्रकल्प कार्य आणि अंतर्गत मूल्यांकन 1 जानेवारी 2025 पासून भारत आणि परदेशातील सर्व CBSE-संलग्न शाळांसाठी आयोजित केले जातील.