JEE Main Admit Card 2022 Released: जेईई मेन परीक्षेची 23 जून पासून सुरूवात; jeemain.nta.nic.in वरून असं करा डाऊनलोड
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: Unsplash.com)

नॅशनल टेस्टिंग एजेंसी (NTA)कडून जेईई में परीक्षेचं हॉल तिकीट जारी करण्यात आलं आहे. अधिकृत वेबसाईट jeemain.nta.nic.in वरून विद्यार्थी त्यांची हॉलतिकीट्स डाऊनलोड करू शकणार आहेत. जेईई मेन्स सेशन 1 ची परीक्षा 23 जून ते 29 जून 2022 दरम्यान होणार आहे. यापूर्वी जेईई मेन्सची परीक्षा 20 जून पासून आयोजित करण्यात आली आहे पण अग्नीपथ स्कीम वरून देशातील तापलेले वातावरण पाहता त्या पुढे ढकलण्यात आल्या होत्या आणि या परीक्षा आता उद्यापासुन होणार आहे. यंदा एटीए कडून जेईई मेन 2022 परीक्षा 501 शहरांमध्ये होणार आहे आणि परदेशात 22 सेंटर्सवर होणार आहे.

कसं डाऊनलोड कराल जेईई मेन्स चं अ‍ॅडमीट कार्ड?

  • jeemain.nta.nic.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  • होमपेजवर 'JEE Main Hall Ticket 2022 session 1' लिंक वर क्लिक करा.
  • उमेदवारांना त्यांचे अ‍ॅप्लिकेशन नंबर आणि जन्म तारीख सबमीट करावी लागेल.
  • त्यानंतर कॅप्चा टाईप करून सबमीट करा.
  • NTA Admit Card 2022 session 1 तुमच्या स्क्रीन वर दिसेल.
  • आता तुमचं अ‍ॅडमीट कार्ड तुम्ही डाऊनलोड करू शकाल.

या डिरेक्ट लिंक वरून डाऊनलोड करा अ‍ॅडमीट कार्ड 

जेईई मेन्स परीक्षेसाठी उमेदवारांना त्यांच्या अ‍ॅडमीट कार्ड सोबत एक आयडी प्रुफ घेऊन जावं लागणार आहे. यामध्ये वोटर आयडी कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, फोटो सह बॅंकेचं पासबूक हे ग्राह्य असणार आहे.

विद्यार्थ्यांच्या जेईई मेन्सच्या हॉल तिकीटावर उमेदवारांचं नाव, वडिलांचं नाव, रोल नंबर, परीक्षा केंद्र, परीक्षा तारीख आणि वेळ, स्वाक्षरी, फोटो आणि सूचना असणार आहेत.