IIT Mumbai (File Image)

IIT Bombay Placement: एका बाजूला हाताला काम आणि नोकरी नसल्यामुळे सुशीक्षित बेरोजगार म्हणून फिरणाऱ्या तरुणांची संख्या प्रचंड वाढते आहे. तर दुसऱ्या बाजूला काही विद्यार्थ्यांना मिळणारे पगाराचे वार्षिक पॅकेजचे (Job Annual Package) आकडे ऐकूनच अनेकांना गरगरायला होते आहे. होय, मुंबई आयआयटीच्या विद्यार्थ्यांना असे दणदणीत पॅकेज मिळाले आहे. होय, नुकतेच मुंबई आयआयटी मध्ये प्लेसमेंट फेसवन पार पडली. यात 25 विद्यार्थ्यांना जवळपास एक कोटीरुपयांपेक्षा अधिक रकमेचे पॅकेज मिळाले आहे. एका विद्यार्थ्याला तर चक्क वार्षिक 3.67 कोटींचा पगार देण्यात आला आहे. मुंबई आयआयटीच्या इतिहासात आतापर्यंत सर्वाधिक 1481 नोकऱ्यांच्या ऑफर विद्यार्थ्यांनी स्वीकारल्याची माहिती आहे. विद्यार्थ्यांना मिळणारी पॅकेजेस पाहून भल्याभल्यांची बत्ती गुल झाली आहे.

दरम्यान, . रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेक्टरच्या सर्वसाधारण पॅकेज वधारल्याचे तर सॉफ्टवेअर सेक्टर क्षेत्रातील पॅकेजमध्ये काहीशी घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. डिसेंबर 11 ते 16 या कालावधीत मुंबई आयआयटीमध्ये प्लेसमेंटची फेज पूर्ण झाली. यंदा फेज वनमध्ये मुंबई आयआयटीच्या इतिहासातील नोकऱ्यांची सर्वाधिक ऑफर विद्यार्थ्यांकडून स्वीकारली गेली. पहिल्या कॅम्पस इटरविव्ह मध्ये एकूण 283 कंपन्यांमधून देण्यात आलेल्या 1648 पैकी 1481 नोकऱ्यांची ऑफर विद्यार्थ्यांकडून स्वीकारण्यात आली. मुंबई आयआयटीच्या इतिहासातील हा सर्वात मोठा आकड्याचे सांगितले जात आहे. (हेही वाचा, अभिमानास्पद! IIT Mumbai भारतात प्रथम, तर जागतिक विद्यापीठ मानांकनांमध्ये 177 वा क्रमांकावर)

प्राप्त माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय पातळवीर सक्रीय असलेल्या 63 कंपन्यांनी मुंबई आयआयटीतील विद्यार्थ्यांना ऑफर दिली. या कंपन्यांची ऑफर विद्यार्थ्यांकडून स्वीकारण्यात आली. यात 25 हून अधिक विद्यार्थ्यांना 1 कोटी रुपयांपेक्षा अधिक पॅकेज विद्यार्थ्यांना मिळाले. एका विद्यार्थ्याला वार्षिक 3.67 कोटी रुपयांचे पॅकेज मिळाले. जे यंदाच्या वर्षातील सर्वाधिक आहे. त्याखालोखाल मिळालेल्या पॅकेजचा आकडा वार्षिक 1.31 कोटी रुपयांचा आहे.