GATE 2021 online Registration: IIT- Bombay कडून गेट 2021 साठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन appsgate.iitb.ac.in वर नियोजित वेळेच्या आधीच सुरू
Online Application | Photo Credits: Pixabay.com

आयआयटी बॉम्बे कडून यंदा Graduate Aptitude Test in Engineering म्हणजेच गेट 2021 (GATE- 2021) च्या ऑनलाईन रजिस्ट्रेशनला सुरूवात झाली आहे. दरम्यान यंदा ही प्रक्रिया नियोजित वेळापत्रकाच्या आधीच सुरू झाली आहे. IIT-Bombay ने प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकामध्ये GATE 2021ची ऑनलाईन रजिस्ट्रेशनची प्रक्रिया 14 सप्टेंबर पासून सुरू होणं अपेक्षित होते मात्र यंदा ते शुक्रवार 11 सप्टेंबर पासूनच सुरू करण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांना GOAPS portal म्हणजेच appsgate.iitb.ac.in वरून गेट साठी 30 सप्टेंबर पर्यंत रजिस्ट्रेशन करता येणार आहे. तर 7 ऑक्टोबर पर्यंत लेट फी भरून विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करण्यासाठी मुभा असेल.

GATE ही राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा असून IISc Bangalore सोबत देशातील 7 अन्य IITs ज्यामध्ये बॉम्बे, दिल्ली, गुवाहटी, कानपूर, खारागपूर, मद्रास आणि रूरकी चा समावेश आहे. ही परीक्षा केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या अखत्यारित असलेल्या NCB-GATE कडून घेतली जाते. JEE Advanced 2020 Date: IIT Delhi कडून Entrance Exam चं सुधारित वेळापत्रक जारी; jeeadv.ac.in वर 11 सप्टेंबर पासून रजिस्ट्रेशन सुरू

GATE 2021साठी ऑनलाईन अ‍प्लाय कसं कराल?

  • आयआयटी बॉम्बेच्या appsgate.iitb.ac.in या वेबसाईटला रजिस्ट्रेशन साठी भेट द्या.
  • “GATE Online Application Portal is live. Click here to Apply” या लिंकवर क्लिक करा.
  • नव्या वेब पेजच्या खाली ‘register here’ वर क्लिक करून आवश्यक माहिती भरा.
  • register id वापरून साईन इन करू शकता.
  • ऑनलाईन फॉर्म नीट आणि शांतपणे भरा. त्यानंतर Registration No./Application No नमूद करून ठेवा.
  • तुमच्या सही आणि फोटोची इमेज अपलोड करा.
  • ऑनलाईन फी  भरा.

दरम्यान आयआयटी बॉम्बे मध्ये गेट 2021 साठी माहितीपत्र पाहण्यासाठी इथे क्लिक करा तर थेट ऑनलाईन रजिस्ट्रेशन लिंक इथे उपलब्ध आहे.

गेट 2021 रजिस्ट्रेशन साठी शुल्क किती?

उमेदवाराला अ‍ॅप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी 1500 रूपये आकारले जातात. मात्र 1 ऑक्टोबर नंतर रजिस्ट्रेशन केल्यास ते 2000 होतील. जातीनिहार आरक्षण असणार्‍यांसाठी, महिला उमेदवारांसाठी ते 750 असेल. तर डेडलाईन नंतर फी 1250 होईल.

GATE 2021 परीक्षा  5,6, 7,12,13 आणि 14 फेब्रुवारी 2021 दिवशी  आहे. प्रत्येक दिवशी 2 सत्रामध्ये परीक्षा होणार आहेत. तर या परीक्षांचे निकाल 22 मार्च दिवशी जाहीर होतील. दरम्यान गेट परीक्षा ऑब्जेक्टिव्ह पद्धतीची असते. MCQ, MSQ आणि किंवा NAT स्वरूपाचे असतात.