भारतात कोरोना संकटाच्या मध्ये एकीकडे जेईई मेन्स, नीट 2020 ची परीक्षा पुढे ढकलण्याबाबत अनेक जण आग्रही असताना आता The Indian Institute of Technology (IIT) Delhi कडून जेईई अॅडव्हान्सचं नवं वेळापत्रक जारी करण्यात आलं आहे. यामध्ये जेईई अॅडव्हान्ससाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन 11 सप्टेंबर पासून सुरू होणार आहे. तर 16 सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना रजिस्टेशनसाठी वेळ देण्यात आला आहे. फी भरण्यासाठी 17 सप्टेंबर पर्यंत वेळ आहे.
इच्छुक विद्यार्थी jeeadv.ac.in या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज दाखल करू शकतात. दरम्यान परीक्षेची तारीख 27 सप्टेंबर असेल आणि निकाल 5 ऑक्टोबर दिवशी जाहीर केला जाईल अशी माहिती देण्यात आली आहे. दरम्यान जेईई मेंस मधील पहिले अडीच लाख विद्यार्थीच केवळ जेईई अॅडव्हान्ससाठी पात्र असतील. परदेशी विद्यार्थ्यांना देखील प्रवेश खुला असतो. त्यांचे 12वीचे मार्क्स पाहून प्रवेश दिला जातो.जेईई अॅडव्हान्सचं वेळापत्रक पाहता जेईई मेन्सचा निकाल 10 सप्टेंबर पर्यंत लागू शकतो.
पात्रता निकष -
जेईई अॅडव्हान्समध्ये प्रवेश मिळवण्यासाठी वयाची मर्यादा आहे. 1ऑक्टोबर 1995 आणि त्याच्यापुढील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. मागासवर्यीग जातीच्या विद्यार्थ्यांना 5 वर्षांची मुभा असेल.
फी-
विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशनच्या वेळेस 2800 रूपये फी भरावी लागेल. मुली आणि जातीच्या आरक्षणानुसार, विद्यार्थ्यांना 1400 रूपये फी असेल. परदेशी विद्यार्थ्यांना $150 तर SAARC देशातील विद्यार्थ्यांना $75 फी असेल.
यंदा 12वीच्या मार्कांच्या नियमांमध्ये थोडी शिथिलता देण्यात आली आहे. पूर्वीप्रमाणे 75% मार्कांची अट नसेल. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध बोर्डांनी वेगवेगळ्या निकषांवर निकाल लावला असल्याने ही शिथिलता असेल.
फिजिक्स, केमेस्ट्री आणि गणित विषयाच्या 2 प्रश्नपत्रिका जेईई अॅडव्हान्सच्या विद्यार्थ्यांना दिले जातात. कम्प्युटर बेस्ड परीक्षेमध्ये 3 तासाच्या कालावधीमध्ये ही प्रश्नपत्रिका पूर्ण करायची असते.