CUET UG Phase II Admit Card 2022: आज 10 वाजल्यापासून अ‍ॅडमिट कार्डस होणार जारी cuet.samarth.ac.in वरून अशी करा डाऊनलोड
online ((Photo Credits: Pexels)

नॅशनल टेस्टिंग एजंसी कडून आज (2 ऑगस्ट) CUET 2022 admit card phase 2 जारी केली जाणार आहेत. एनटीए दिलेल्या माहितीनुसार सकाळी 10 वाजल्यापासून ती विद्यार्थ्यांना डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध असतील. दरम्यान ज्यांची परीक्षा 4,5,6 ऑगस्ट दिवशी आहे त्यांच्यासाठी ही अ‍ॅडमीट कार्डस आहे. पुढील तारख्यांच्या परीक्षांसाठी 4 ऑगस्टला अ‍ॅडमीट कार्ड जारी केली जाणार आहेत. CUET admit card 2022 डाऊनलोड करण्यासाठी विद्यार्थ्यांना cuet.samarth.ac.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागणार आहे.

विद्यार्थ्यांना अ‍ॅडमीट कार्ड्स डाऊनलोड करण्यासाठी त्यांचा अ‍ॅप्लिकेशन नंबर आणि जन्म तारीख टाकून CUET login window द्वारा अ‍ॅडमीट कार्ड घेता येईल.

पहा ट्वीट

कसं डाऊनलोड कराल अ‍ॅडमीट कार्ड?

  • CUET ची वेबसाईट cuet.samarth.ac.in

    ला भेट द्या.

  • होम पेज वर ‘Download Admit Card’वर क्लिक करा.
  • नवीन लॉगिन पेज स्क्रीन वर दिसेल.
  • आता तुमचा अ‍ॅप्लिकेशन नंबर, जन्मतारीख आणि कॅप्चा कोड दिसेल. त्यानंतर साईन इन बटण वर क्लिक करा.
  • आता तुमच्या स्क्रिनवर CUET admit card 2022 दिसेल.
  • आता सारे तपशील तपासून हॉलतिकीट डाऊनलोड करा.

CUET ही ऑल इंडिया लेव्हल परीक्षा आहे. ज्याच्या द्वारा 44 सेंट्रल आणि 46 इतर युनिव्हरसिटीज ऑफ इंडिया मध्ये अंडर ग्रॅज्युएट कोर्स साठी प्रवेश दिले जाणार आहेत. सहभागी विद्यापीठे CUET परीक्षेतील उमेदवारांनी मिळवलेल्या गुणांच्या आधारे त्यांच्या पदवीपूर्व अभ्यासक्रमांना प्रवेश देतील.