CBSE Compartment Exam 2022 Admit Cards: सीबीएसई च्या 10,12वीच्या कम्पार्टमेंट परीक्षांची हॉल तिकीट्स जारी; cbse.gov.in वरून  अशी करा डाऊनलोड!

सीबीएसई कडून CBSE Compartment Exam 2022 ची अ‍ॅडमीट कार्ड्स जारी करण्यात आली आहेत. जे विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत ते आपली हॉलतिकीट्स अधिकृत वेबसाईट www.cbse.gov.in किंवा parikshasangam.cbse.gov.in ला भेट देऊन ती डाऊनलोड करू शकतात. यंदा सीबीएससी कडून बारावीची कम्पार्टमेंट परीक्षा 23 ऑगस्ट दिवशी होणार आहे तर दहावीची परीक्षा 23 ते 29 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. हे देखील नक्की वाचा: CBSE Compartment Exam 2022: दहावी आणि बारावीचे वेळापत्रक cbse.gov.in वर जाहीर; जाणून घ्या परिक्षेचा तपशील .

कसं डाऊनलोड कराल हॉल तिकीट?

  • CBSE ची अधिकृत वेबसाईट cbse.gov.in ला भेट द्या.
  • होमपेज वर "Pariksha Sangam Portal" या लिंकवर क्लिक करा.
  • त्यानंतर "Schools" आणि 'Pre-Exam Activities'हे पर्याय निवडा.
  • 'Admit Card, Centre Material for Comptt Exam 2022' वर क्लिक करा.
  • पुढे तुमचे लॉगिन डिटेल्स टाकून डाऊनलोड अ‍ॅडमीट कार्ड चा पर्याय निवडा.
  • आता तुमच्या हॉलतिकीटाची प्रिंट आऊट देखील तुम्ही काढून ठेवू शकता.

विद्यार्थ्यांना त्यांचं अ‍ॅडमीट कार्ड हवं असल्यास शाळेशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. शाळेत मुख्याध्यापकांच्या सही, शिक्क्याने अ‍ॅडमीट कार्ड्स वितारित केली जाणार आहेत. खाजगी विद्यार्थ्यांसाठी देखील लवकरच कार्ड्स प्रसिद्ध केली जाणार आहेत.