 
                                                                 CBSE Board Exam 2024: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (Central Board of Secondary Education) इयत्ता दहावी आणि बारावीच्या परिक्षांचे वेळापत्रक 12 डिसेंबर 2024 रोजी जाहिर केलं होते. मात्र, या वेळपत्रकात बदल करण्यात आला. तर पुन्हा एकदा सुधारित वेळापत्रक जाहिर करण्यात आला आहे. सुधारित वेळापत्रक https://www.cbse.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. 2023-24 या शैक्षणिक वर्षात परिक्षेला बसलेले विद्यार्थी सीबीएसई बोर्डाची अधिकृत वेबसाईट cbse.gov.in वेळापत्रक पाहू शकता.
काही विषयांच्या पेपरच्या परिक्षेच्या तारखांमध्ये बदल करण्यात आले आहेत, त्यामुळे सीबीएसईनं वेळापत्रक जारी केला आहे. इयत्ता दहावीची तिबेटमधील पेपर परिक्षा आता फेब्रुवारी रोजी घेतली जाईल, यापूर्वी जारी करण्यात आलेल्या वेळापत्रकात हा पेपर 4 मार्च रोजी घेतला जाणार होता. तसेच इयत्ता दहावीची रिटेल परिक्षा 16 फेब्रुवारीला होणार होती,ती आता 29 फेब्रुवारीला होणार आहे.बारावी फॅशन स्टडीजची परीक्षा आता 11 मार्चऐवजी 21 मार्चला होणार आहे. Board Exams: आता वर्षातून दोनदा होणार बोर्डाच्या परीक्षा; विषय निवडण्याचे स्वातंत्र्य, जाणून घ्या सविस्तर .
सुधारीत वेळापत्रकानुसार, सीबीएसई बोर्डाकडून 15 फेब्रुवारीपासून दहावी आणि बारावीच्या परिक्षा सुरु होणार आहे,दहावीच्या विद्यार्थ्यांचे पेपर हे 13 मार्चला संपणार आहेत, तर इयत्ता बारावीच्या परिक्षा २ एप्रिलला संपणार आहे असं सुधारिक वेळापत्रकात आहे. महत्त्वाचं म्हणजे सकाळी साडेदहा ते दुपारी दीड या वेळेत सर्व दिवस परिक्षा होणार आहे. इयत्ता दहावी आणि बारावीचे विद्यार्थी अधिकृत वेबसाईटला भेट देऊन तुम्ही वेळापत्रक डाऊनलोड करू शकतात.
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
