CBSE 10th Term 1 Result Update: सीबीएसई कडून दहावीच्या टर्म 1 निकालाबाबत मोठी अपडेट जारी; पहा तुमचे गुण यंदा कुठे पहायला मिळणार?
CBSE | (Photo Credit: ANI)

सीबीएसई बोर्डाने (CBSE Board) यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन टर्म मध्ये 10वी,12वी ची परीक्षा घेतली आहे. त्यापैकी पहिल्या टर्मच्या निकालाची विद्यार्थ्यांना उत्सुकता होती. आणि आज (12 मार्च) सीबीएसई बोर्डाने या निकालाबाबत महत्त्वाची अपडेट दिली आहे. सीबीएसई ने यंदा पूर्वीप्रमाणे ऑनलाईन निकाल जारी केलेला नाही. पण लेखी परीक्षेचे मार्क्स संबंधित शाळांना दिले आहे. विद्यार्थ्यांचे प्रॅक्टिकल आणि अंतर्गत मूल्यमापनाचे गुण आता शाळा एकत्र करून अंतिम निकाल दिला जाणार आहे. त्यामुळे सीबीएसई बोर्डाला विद्यार्थ्यांच्या अंतिम गुणपत्रिकेला हाती मिळवण्यासाठी अजून काही दिवस प्रतिक्षा करावी लागणार आहे.

CBSE HQ Tweet

कालच बोर्डाने 10वी, 12वी च्या टर्म 2 च्या तारखा जारी केल्या आहेत. सीबीएससीची टर्म 2 12वीची परीक्षा आणि 10वीची परीक्षा यंदा 26 एप्रिल 2022 पासून सुरू होणार आहे.त्यामध्ये 10वीची परीक्षा 24 मे दिवशी संपणार आहे आणि 12वीची परीक्षा 15 जून दिवशी संपणार आहे.

CBSE च्या दहावीच्या टर्म-1 परीक्षा 30 नोव्हेंबर ते 11 डिसेंबर 2021 दरम्यान घेण्यात आल्या होत्या. टर्म-1 परीक्षा संबंधित शाळांमध्ये ऑफलाइन पद्धतीने घेण्यात आल्या होत्या. पहिल्या टर्ममध्ये मिळालेल्या गुणांनुसार कोणताही विद्यार्थी नापास होणार नाही किंवा उत्तीर्ण होणार नाही, असे बोर्डाने स्पष्टपणे नमूद केले आहे. अंतिम निकालाची माहिती शैक्षणिक वर्षाच्या शेवटी दोन्ही टर्ममधील गुणांच्या आधारे केली जाईल.