CBSE Class 10,12th  Date Sheet 2022 Term 2: सीबीएससी बोर्डाने जाहीर केलं टर्म 2 बोर्डाच्या परीक्षेचं सविस्तर वेळापत्रक;  cbse.gov.in वर पहा तारखा
Representational Image (Photo Credits: PTI)

सीबीएससी (CBSE) कडून यंदा 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांच्या टर्म 2 च्या परीक्षेचं सविस्तर वेळापत्रक जारी करण्यात आले आहे. कोरोना वायरसच्या धुमाकुळीमध्ये यंदा सीबीएससी बोर्डाने बोर्डाची परीक्षा दोन टर्म मध्ये घेण्याचा निर्णय घेतला आहे. पहिली टर्म डिसेंबर महिन्यात पार पडल्यानंतर आता दुसरी टर्म एप्रिल महिन्यात होणार आहेत. नुकतेच विषयांनुसार सविस्तर वेळापत्रक बोर्डाकडून जारी करण्यात आले आहे.

सीबीएससीची टर्म 2 12वीची परीक्षा आणि 10वीची परीक्षा यंदा 26 एप्रिल 2022 पासून सुरू होणार आहे.त्यामध्ये 10वीची परीक्षा 24 मे दिवशी संपणार आहे आणि 12वीची परीक्सा 15 जून दिवशी संपणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांचे सविस्तर वेळापत्रक cbse.gov.in या बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट वर पाहता येणार आहे. नक्की वाचा: CBSE बोर्डाचा दिलासा; परदेशात विद्यार्थ्यांना सीबीएसई संलग्न शाळांमध्ये प्रवेशासाठी आता बोर्डाकडून पूर्व परवानगीची गरज नाही.

टर्म 2 ची 10वी, 12वी ची परीक्षा ही मायनर एक्झामिनेशन पासून सुरू होणार आहे. यामध्ये 12वी साठी पहिला पेपर Entrepreneurship असणार आहे तर 10वी साठी Painting असणार आहे.

इथे पहा 10वीचं सविस्तर वेळापत्रक

इथे पहा 12वीचं सविस्तर वेळापत्रक

टर्म 2 ची परीक्षा आता ऑफलाईन होणार आहे. विद्यार्थ्यांना सब्जेक्टिव्ह स्वरूपात या परीक्षेसाठी सामोरं जायचं आहे. 2 तासांचा पेपर त्यांना लिहावा लागेल. सकाळी साडेदहा ते साडे बारा या दोन तासांचा हा पेपर असणार आहे. पूर्वीपेक्षा यंदा दोन पेपर मधील फरक कमी असेल. कारण इतर स्पर्धात्मक परीक्षा देखील येऊ घातल्याने त्यासोबतचा क्लॅश टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

अद्याप सीबीएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांना टर्म 1 च्या निकालाची प्रतिक्षा आहे. बोर्डाने अजूनही त्यांचे गुण जाहीर केलेले नाहीत. सोशल मीडीयामध्ये निकालाबाबत अनेक अफवा पसरत आहेत पण त्याला बोर्डाने फेटाळून लावले आहे. निकाल कधी आणि कोणत्या स्वरूपात जाहीर केला जाईल याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.