CBSE 10th Result 2020: आज सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल; cbsesresults.nic.in वर पहा तुमचा स्कोअर
Logo of the Central Board of Secondary Education (Photo Credits: cbse.nic.in)

सीबीएसई बोर्डाच्या (CBSE  Board) 12वीच्या निकालापाठोपाठ आज देशभर 10 वीचे निकाल जाहीर होणार आहेत. केंद्रीय मनुष्यबळ व संसाधन मंत्री रमेश पोखरियाल (HRD minister Dr Ramesh Pokhriyal Nishank) यांनी याबाबत काल माहिती दिली आहे. आता आज (15 जुलै) सीबीएसईच्या अधिकृत वेबसाईटवर cbseresult.nic.in वर निकाल जाहीर होणार आहे. सुमारे 18 लाख विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर केला जाईल. दरम्यान काल ट्वीटरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना निकालाची तारीख सांगताना पोखरियाल यांनी शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

सीबीएसई कडून दोन दिवसांपूर्वीच 12वीचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा 12वीचा निकाल 88.78% लागला असून मागील वर्षीच्या तुलनेत तो यंदा वाढला आहे.

सीबीएसई बोर्ड दहावीचा निकाल ऑनलाईन कसा बघाल?

  • बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट्स cbseresults.nic.in किंवा cbse.nic.in उघडा.
  • होम पेज वरील दहावी इयत्तेचा निकाल पाहण्यासाठी Class 10 Result 2020 वर क्लिक करा.
  • तुमचा रजिस्ट्रेशन क्रमांक, रोल नंबर व प्रवेशपत्रावरील योग्य ती माहिती नेमून दिलेल्या रकान्यात भरा, आणि सबमिट करा.
  • तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल त्यातील मार्क्स व आपले नाव तपासून घेऊन मग त्याची प्रिंट काढा.

कसा लागणार यंदाचा सीबीएसई बोर्डाचा निकाल?

इयत्ता दहावी आणि बारावी या दोन्ही वर्गाच्या विद्यार्थ्‍यांकरिता, ज्यांनी सर्व परीक्षा पूर्ण केली आहे, त्यांचे त्यांनी परीक्षेमध्ये ज्याप्रमाणे कामगिरी केली आहे, त्याआधारे त्यांचे निकाल जाहीर करण्यात येणार आहेत.

ज्या विद्यार्थ्‍यांनी तीनपेक्षा जास्त विषयांची परीक्षा दिली आहे. त्या विद्यार्थ्‍यांनी ज्या तीन विषयात जास्त गुण मिळवले आहेत, त्यांची सरासरी घेवून त्या गुणांकनानुसार ज्या विषयाची परीक्षा त्यांनी दिलेली नाही, त्या विषयांना तितके गुण गृहित धरले जाणार आहेत.

ज्या मुलांनी फक्त तीनच विषयांची परीक्षा दिली आहे, त्यांना ज्या दोन विषयात जास्त गुण मिळाले आहेत, त्या गुणांची सरासरी इतर अनुपस्थित राहिलेल्या विषयांना गुण देताना ग्राह्य धरले जाणार.

ऑनलाईन वेबसाईट प्रमाणेच आता 7 वेगवेगळ्या पर्यायांनी काल पाहण्याची सोय आहे. यामध्ये एमएमएस, डिजिलॉकर, इमेल, आयविआरएस, उमंग अ‍ॅपचा देखील वापर करता येऊ शकतो.