प्रतिकात्मक फोटो (File Photo)

BOI Recruitment 2021: बँकेत नोकरी करमण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी ही महत्वाची बातमी आहे. कारण बँक ऑफ इंडिया मध्ये योग्य उमेदवारांची नोकर भरतीसाठी निवड केली जाणार आहे. या नोकर भरतीत एकूण 21 पदांवर उमेदवार निवडले जाणार आहेत. त्यामुळे ज्या उमेदवारांना या नोकर भरतीसाठी अर्ज करायचा असेल त्यांनी अधिकृत वेबसाइट bankofindia.in वर ऑनलाईन अर्ज करावा. या पदासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट दिली आहे. त्यामुळे अंतिम तारखेनंतर कोणताही अर्ज स्विकारला जाणार नाही आहे. बँकेने ही नोकर भरती विविध क्षेत्रासाठी काढली आहे.

सपोर्ट स्टाफ पदासाठी अर्ज करण्याऱ्या उमेदवारांकडे बीएसडब्लू/बीए/बीकॉम मध्ये डिग्री घेतलेली असावी. त्याचसोबत कंप्युटरचे ज्ञान असावे. उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्ष आणि अधिकाधिक 45 वर्ष असणे आवश्यक आहे. या नोकर भरती व्यतिरिक्त उमेदवारांना अन्य काही प्रश्न असतील तर त्यांनी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.(Union Bank Recruitment 2021: पदव्युत्तर शिक्षण पुर्ण केलेल्या युवकांना युनियन बँकेत नोकरी करण्याची संधी, 347 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू)

बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरी करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी लक्षात ठेवावे की, फॅकल्टीच्या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 25-63 वर्ष असावे. तसेच ऑफिस असिस्टंट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18-63 वर्ष असावे. आरक्षित वर्गासाठी उमेदावाराला सरकारने नियमानुसार सूट दिली जाणार आहे.

सपोर्ट स्टाफच्या पदासाठी उमेदवारांना लेखी परिक्षा, व्यक्तीगत इंटरव्यू आणि प्रेजेंटेशनच्या आधारावर निवड केली जाणार आहे. या व्यतिरिक्त सामान्य ज्ञान आणि कंप्युटर क्षमता संबंधित प्रश्न सुद्धा विचारले जाणार आहेत. त्याचसोबत उमेदवारांना इंटरव्यू मध्ये लीडरशिप, कम्युनिकेशन स्किल्स, प्रॉब्लेम सॉल्विंगसह अन्य प्रश्न ही विचारले जाणार आहेत.