7th Pay Commission: महाशिवरात्रीच्या (Maha Shivratri) अगोदरचं ओडिशाच्या (Odisha) लाखो सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर मिळण्याची शक्यता आहे. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक (Naveen Patnaik) यांनी आज सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (Dearness Allowance) 5 टक्क्यांनी वाढ केली आहे.
मुख्यमंत्री कार्यालयाद्वारे मिळालेल्या माहितीनुसार, नवीन पटनाईक यांनी सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 5 टक्क्यांची वाढ केली आहे. हा बदल जानेवारी 2020 पासून लागू करण्यात आला आहे. या वाढीमुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात एकूण 14 टक्क्यांची वाढ झाली आहे. मागील वर्षी पेन्शन धारकांच्या महागाई भत्त्यात 3 टक्क्यांची वाढ करण्यात आली होती. तसेच आता मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी सातव्या वेतन आयोगानुसार, सीपीसी अंतर्गत 10 टक्क्यांची वाढ करण्यासही हिरवा कंदिल दाखवला आहे. पटनायक यांनी आज केलेल्या या घोषणेनुसार, ओडिशातील तब्बल 3.5 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार आहे. (हेही वाचा - Maharashtra Board HSC, SSC 2020 Timetable: महाराष्ट्र बोर्डाच्या 12 वी, 10 वी च्या परीक्षांचं वेळापत्रक PDF स्वरूपात पहा आणि डाऊनलोड करा; mahahsscboard.in वर अधिक माहिती)
ओडिशा सरकारने एका वर्षात दोनवेळा सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली आहे. याअगोदर 25 जानेवारीला हिमाचल प्रदेशच्या सरकारने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 5 टक्क्यांची वाढ केली होती. या वृद्धीमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर 250 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे.