Maharashtra Board 10th and 12th Exam Date Sheet: महाराष्ट्रामध्ये बोर्डाच्या परीक्षांना फेब्रुवारी महिन्यापासून सुरूवात झाली आहे. दरम्यान 12वी म्हणजे HSC बोर्डाची परीक्षा 18 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे तर 10 वी म्हणजे SSC बोर्डाची परीक्षा 3 मार्चपासून सुरू होणार आहे. राज्यात महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाकडून घेतली जाणारी परीक्षा पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण अशा 9 विभागीय मंडळांमध्ये ही परीक्षा घेतली जाते. मग यंदा तुम्ही देखील बोर्डाच्या परीक्षेला सामोरे जाणार असाल तर एका क्लिकवर दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचं 2019-20 शैक्षणिक वर्षाचं बोर्डाच्या परीक्षांचं वेळापत्रक इथे पहा. खुशखबर! दहावी-बारावी च्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई मेट्रो सुरु करणार 'ट्रॅव्हल हेल्पडेस्क' जेथे पाल्यासह पालकांना मिळणार 'ही' विशेष सुविधा.
यंदा दहावीची बोर्ड परीक्षा 3 मार्च ते 23 मार्च 2020 दरम्यान पार पडणार आहे. तर बारावीची परीक्षा 18 फेब्रुवारी ते 18 मार्च दरम्यान पार पडणार आहे. यावर्षी 17 लाखांहून अधिक विद्यार्थी या परीक्षेला बसणार आहेत. त्यामुळे परीक्षेची तयारी करताना नेमकी कोणत्या विषयाची परीक्षा कधी आहे याचे वेळापत्रक नीट पाहूनच या महिन्याभराच्या कालावधीचं प्लॅनिंग करा. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! गुणपत्रिकेवरुन 'अनुत्तीर्ण' शेरा हटवण्यात येणार.
महाराष्ट्र बोर्ड परीक्षा 2020 वेळापत्रक
3 मार्च पासून सुरू होणार्या दहावीच्या परीक्षांचं पीडीएफ स्वरूपातील वेळापत्रक डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. तर 18 फेब्रुवारी पासून सुरू होणार्या बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
दहावीचे विद्यार्थी बदलेल्या अभ्यासक्रमानुसार परीक्षा देणार आहे. तर पुन्हा परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांसाठी पूर्वीच्या अभ्यासक्रमावर आधारित जुने वेळापत्रक वेगळे जाहीर करण्यात आले आहे. प्रॅक्टिकल आणि तोंडी परीक्षेचे वेळापत्रक विद्यार्थ्यांना शाळेकडूनच दिले जाणार आहे. शिक्षण मंडळाने ऑगस्ट 2019 मध्ये जाहीर केलेल्या नियामांनुसार यंदा 12 वी परीक्षा 650 ऐवजी 600 गुणांची घेतली जाणार आहे. हा नवा नियम शैक्षणिक वर्ष 2019-20 आणि शैक्षणिक वर्ष 2020-21 पासून इयत्ता बारावी साठी लागू करण्यात येईल. सध्या हे अतिरिक्त 50 गुण पर्यावरण शास्त्र विषयास देण्यात येत आहेत. त्याऐवजी नव्या शैक्षणिक वर्षापासून याचे श्रेणी पद्धतीमध्ये दिले जाणार आहेत.