Finance Minister Nirmala Sitharaman | (Photo Credits: ANI)

सध्या देशातील विविध क्षेत्रात आर्थिक मंदी (Economy Slowdown) सुरु असल्याने आतापर्यंत हजारो लोकांच्या नोकरीवर गदा आली आहे. त्यामुळे आर्थिक मंदी ही एक गंभीर बाब असून त्याचा फटका सामान्यांपासून ते उच्च वर्गातील लोकांना बसत आहे. त्यातच ऑटो सेक्टरमध्ये सुद्धा आर्थिक मंदी सुरु आहे. मात्र ऑटो सेक्टरमधील (Auto Sector) आर्थिक मंदीसाठी विविध कारणे ही आहेत. परंतु त्यामधी मुख्यत्वे ओला आणि उबर कॅब यांच्या सर्विसमुळे याचा फटका ऑटो सेक्टरला अधिक बसल्याचे अर्थमंत्री निर्माला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी म्हटले आहे.

ऑगस्ट महिन्यात जवळजवळ दहा वेळा गाड्यांच्या विक्रीत विक्रमी घट झाली आहे. तर ओला आणि उबर सारख्या टॅक्सीमुळे वाहन कंपन्यांना याचा मोठा फटका बसला आहे. त्याचसोबत तरुणाईची बदलती जीवनशैली आणि मानसिकता सुद्धा ऑटो क्षेत्रातील मंदीचे एक कारण असल्याचे सीतारमण यांनी म्हटले आहे. तसेच ऑटो सेक्टरच्या मंदीसाठी बीएस-6 तरतुद, रजिस्ट्रेशन फी आणि लोकांची मानसिकता सुद्धा कारणीभुत आहे.(Maruti Suzuki मधील 3 हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाण्याची शक्यता, आर्थिक मंदीचा बसणार फटका)

नवी गाडी खरेदी केल्यानंतर त्याचे ईएमआय भरणे काही वेळेस डोकेदुखी होते. त्यामुळे सध्या बहुतांश नागरिक खिशाला परवडेल अश्या ओला आणि उबेरच्या माध्यमातून प्रवास करणे महत्वाचे मानतात. तर ऑटो सेक्टरमधील आर्थिक मंदीमुळे आता पर्यंत गाड्यांच्या विक्रीत 41 टक्क्यांपेक्षा जास्त घसरण झाली आहे.