Photo Credit- X

Donald Trump's Sand Art: कलाकार सुदर्शन पटनायक यांनी डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांच्या शपथविधी सोहळ्याचे एका खास पद्धतीने स्वागत केले आहे. शपथविधी सोहळ्याच्या अगदी आधी त्यांनी समुद्रकिनाऱ्यावर एक खास कलाकृती तयार केली आहे. 47 फूट लांबीची ही कलाकृती(Sand Art) पटनायक यांच्या ट्रम्पबद्दलच्या कौतुकाचे प्रतिबिंब आहे. सुरदर्शन पटनायक स्वतःला डोनाल्ड ट्रम्पचे मोठे चाहते मानतात. त्यामुळे ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याचे स्वागत करण्यासाठी त्यांनी ही कलाकृती विशेषतः प्रदर्शित केली आहे.(Donald Trump Meets Mukesh Ambani: डोनाल्ड ट्रम्प यांनी यांनी शपथविधी समारंभापूर्वी घेतली मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची भेट)

व्हर्जिनियामध्ये डोनाल्ह ट्रम्प यांचा शपथविधी सोहळा पार पडत आहे. या भव्य सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी जगभरातील मोठ्या व्यक्ती दाखल झाल्या आहेत. यामध्ये भारतातील अनेक महान व्यक्तींचाही समावेश आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष तसेच रिलायन्स फाउंडेशनच्या संस्थापक मुकेश अंबानी आणि अध्यक्षा नीता अंबानी या उपस्थित झाल्या आहेत. यांच्याव्यतिरिक्त, एलोन मस्क, जेफ बेझोस आणि मार्क झुकरबर्ग सारख्या आंतरराष्ट्रीय टेक दिग्गजांचा समावेश आहे. फ्रेंच अब्जाधीश आणि तंत्रज्ञान उद्योजक झेवियर नील हे देखील त्यांच्या पत्नीसह उपस्थित आहेत.

शपथविधी सोहळ्याच्या कार्यक्रमात भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकरही सामील होत आहेत. व्हर्जिनियातील ट्रम्प नॅशनल गोल्फ क्लबमध्ये स्वागत समारंभ आणि आतषबाजीने सोहळ्याची सुरुवात झाली. या कार्यक्रमात मार्क झुकरबर्ग आणि रिपब्लिकन मेगा-डोनर मिरियम अॅडेल्सन यांनी सह-आयोजित केलेल्या ब्लॅक-टाय रिसेप्शन यांचा समावेश होता.