Donald Trump Meets Mukesh Ambani: अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सोमवारी 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतील. ट्रम्प पुन्हा अमेरिकेत सत्तेत येणार आहेत. ट्रम्प यांचा हा शपथविधी समारंभ अमेरिकेच्या इतिहासातील एक महत्त्वाची घटना आहे. शपथविधी सोहळ्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी वॉशिंग्टन डीसीमध्ये एका डिनरचे आयोजन केले आहे, ज्यामध्ये भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांची पत्नी नीता अंबानी देखील पोहोचले आहेत. मुकेश अंबानी आणि त्यांची पत्नी नीता अंबानी यांनीही काही काळापूर्वी ट्रम्प यांची भेट घेतली होती. ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी आमंत्रित केलेल्या खास पाहुण्यांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि त्यांच्या पत्नी नीता अंबानी यांचा समावेश आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी यांनी घेतली मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची भेट -
US President-elect Donald J Trump met Reliance Industries Chairman Mukesh Ambani & Founder & Chairperson of Reliance Foundation, Nita Ambani ahead of the swearing-in ceremony
The swearing-in ceremony of President-elect Donald J Trump as the 47th President of the United States of… pic.twitter.com/5Xk81ry5FV
— ANI (@ANI) January 19, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)