प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Facebook)

दिवाळीला (Diwali 2020) यावर्षी 12 नोव्हेंबरपासून सुरुवात झाली आहे. दिवाळीच्या पहिल्या दिवशी वसुबारस आणि दुसऱ्या दिवशी धनत्रयोदशी (Dhanteras) साजरी केली जाते. दरवर्षी कार्तिक मासच्या कृष्ण पक्षाला जी त्रयोदशी येते त्याला धनत्रयोदशी म्हणतात. धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर सोन्याची (Gold Purchase) खरेदी केली जाते. मात्र, कोरोना संकट आणि संपूर्ण देश लॉकडाऊनमध्ये असल्यामुळे यावर्षी सोन्याची खरेदीवर मोठा परिणाम होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. परंतु, मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी सोन्याच्या विक्रीत तब्बल 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. आयबीजेएच्या आकडेवारीनुसार, यावर्षी देशभरात धनत्रयोदशीला तब्बल 40 टन सोन्याची विक्री झाली आहे.

आयबीजेएचे राष्ट्रीय सचिव सुरेंद्र मेहता यांनी आयएएनएसला सांगितले की, गेल्या वर्षी 12 हजार कोटी रुपयांच्या सोन्याची विक्री झाली होती. मात्र, यावर्षी हा आकडा 20 हजार कोटींच्या घरात पोहोचला आहे. यावर्षी देशभरात धनत्रयोदशीला तब्बल 40 टन सोन्याची विक्री झाली आहे, बाजारभावानुसार याची किंमत 20 हजार कोटी रुपयांच्या घरात आहे. गेल्या वर्षी धनत्रयोदशीला 30 टन सोने विक्री झाली होती. सोन्याच्या विक्रीत गेल्यावर्षीच्या तुलनेत 30 ते 35 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मात्र, किंमतीनुसार ही वाढ 70 टक्क्यांनी वाढली आहे, असेही मेहता म्हणाले आहेत. हे देखील वाचा- Gold Rate On Laxmi Pujan 2020: लक्ष्मी पुजनाच्या दिवशी सोन्याचे भाव पुन्हा वधारले; जाणून घ्या मुंबई मधील आजचा सोनं, चांदीचा दर!

दरम्यान, कार्तिक महिन्यातील कृष्णपक्षांच्या त्रयोदशीच्या दिवशी भगवान धन्वंतरी समुद्र मंथन दरम्यान त्यांच्या हातात अमृत कलश घेऊन प्रकट झाले. भगवान धन्वंतरी वैद्यकीय विज्ञानाचा प्रसार करण्यासाठी त्यांनी अवतार घेतल्याचे मानले जाते. पौराणिक मान्यतेनुसार, धनत्रयोदशीच्या दिवशी लक्ष्मीची पूजा केल्यास पैशाची आणि धान्याची कमतरता भासत नाही, अशी अनेकांची श्रद्धा आहे.