Photo Credits: ANI

New Year 2025: मोठ्या उत्साहात आणि आनंदात वर्ष 2025 च्या स्वागतासाठी (New Year 2025)मंदिर आणि नदी घाटांवर भाविक(Devotees) मोठी गर्दी करत आहेत. शंख, ढोल, ताशे आणि पूजेच्या घंटा नादात नागरिक रमले आहेत. वृंदावनमध्ये, बांके बिहारी मंदिरात नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला प्रार्थना करण्यासाठी आणि पुढील वर्षासाठी आशीर्वाद घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने मंदिरात हजर झाले होते. धार्मिक विधींमुळे देसभरात वातावरण भक्तीमय झाले आहे. वृंदावनमधील प्रेम मंदिरातही मोठ्या प्रमाणात नागरिक हजर झाले आहेत. मोठ्या संख्येने भक्त प्रार्थना करण्यासाठी आणि नवीन वर्षाची सुरुवात धार्मिकतेने करण्यासाठी जमले होते. (First Sunrise of 2025 Videos: कोचीपासून पुरी आणि चेन्नईपर्यंत, भारतातील वेगवेगळ्या राज्यातील पहिल्या सूर्योदयाची दृश्ये)

बांके बिहारी मंदिराच्या दर्शनासाठी बाहेर भक्तांची गर्दी

बिर्ला मंदिरात सकाळची आरती

झंडेवालान मंदिरात भाविकांची गर्दी

दरम्यान, मसुरीमध्ये नवीन वर्ष 2025 ची सुरुवात साजरी करण्यासाठी मोठा जनसमुदाय पोहोचला. नवीन वर्ष 2025 ची सुरुवात साजरी करण्यासाठी लोकांनी हिल स्टेशनवर मोठी गर्दी केली. निसर्गरम्य वातावरणात नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी स्थानिक आणि पर्यटक एकत्र जमल्याने शहरात उत्सवाचा उत्साह दिसून आला.