Delhi Weather Today: काल रात्रीपासून दिल्ली आणि नोएडामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे शहराच्या तापमानात घट झाली आहे. पावसामुळे राजधानीतील रस्त्यांवर अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. दरम्यान, हवामान खात्याने (IMD) गुरुवारी म्हणजेच २९ ऑगस्टला पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. IMD नुसार, आज दिल्ली NCR मध्ये ढगाळ वातावरण असेल आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. या कालावधीत तापमान ३४ अंश सेल्सिअस ते २३ अंश सेल्सिअस दरम्यान राहू शकते. हवामानाचा हा टप्पा 30 ऑगस्टलाही कायम राहणार आहे. राष्ट्रीय राजधानीत शुक्रवारीही हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. यानंतर 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी हवामान कोरडे राहील.
पाहा व्हिडीओ:
DELHI : भारी बारिश के कारण कई इलाकों में जलभराव।#DelhiRains #Rain #rainfall #HeavyRain #HeavyRainfall #IndiaNews #IndiaNewsUP_UK pic.twitter.com/9YzWBvKSu4
— India News UP/UK (@IndiaNewsUP_UK) August 29, 2024
बुधवारी दिल्लीचे कमाल तापमान 34 अंश आणि किमान तापमान 23.4 अंश होते, जे सामान्यपेक्षा 3 अंश कमी आहे. काल दिल्ली (सफदरजंग) मध्ये 2.4 मिमी, लोधी रोडमध्ये 2.6 मिमी, आया नगरमध्ये 0.8 मिमी, पुसामध्ये 0.5 मिमी आणि मयूर विहारमध्ये 2.5 मिमी पाऊस झाला होता.
दिल्ली आणि नोएडामध्ये मुसळधार पाऊस
हवामान अंदाज एजन्सी स्कायमेटच्या मते, मान्सूनची रेषा दिल्लीच्या आसपास कायम आहे. त्यामुळे पुढील आठवड्यापासून मान्सून पुन्हा एकदा जोर धरणार असून पावसाचा जोर वाढणार आहे. त्याचवेळी बंगालच्या उपसागरावर गुरुवारी कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. 29 आणि 30 ऑगस्ट रोजी ते समुद्रावर राहील. जेव्हा ही प्रणाली जमिनीवरून फिरेल तेव्हा मान्सूनची रेषा दिल्लीच्या जवळ असेल. मान्सूनची रेषा 2 ते 6 सप्टेंबर दरम्यान दिल्लीच्या जवळ असेल. त्यामुळे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.