तळीराम चकणा खाण्यात मग्न, रेल्वेने तिघांना चिरडले 
फोटो सौजन्य- फाइल इमेज

दसऱ्याच्या वेळी अमृतसरमध्ये भयानक रेल्वे अपघातामुळे अनेकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे अमृतसरमधील नागरिकांना धक्का बसला. ही घटना ताजी असताना दिल्लीमधील रेल्वे रुळांवर तळीराम पिण्यास बसले असताना समोरुन येणाऱ्या रेल्वेने त्यांना चिरडले असल्याची धक्कादायक घटना आज सकाळी घडली आहे.

नांगलोई रेल्वेच्या रुळांवर तीन जण भरदिवसा पिण्याच्या नादात गुंग होती. त्यावेळी सकाळी 7.30 सुमारास समोरुन रेल्वे येत आहे हे या तळीरामांना कळले नाही. त्यामुळे या रेल्वेने या तिघांना जोरात धडक ती देत पुढे गेली.

या घटनेमध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे.तसेच पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. अद्याप या मृत व्यक्तींची ओळख पटली नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.