अर्नब गोस्वामी (Photo Credits: PTI)

रिपब्लिक टिव्हीचे प्रमुख संपादक अर्नब गोस्वामी (Arnab Goswami) यांना एका इंटीरियर डिझायनर याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यामुळेच त्यांच्या अटकेच्या विरोधात भाजप नेते तेजिंदर बग्गा आणि कपिल मिश्रा यांच्याकडून दिल्लीतील राजघाटवर आंदोलन केल्याने अटक करण्यात आली आहे. भाजपच्या दोन्ही नेत्यांना दिल्लीतील राजघाटवर अर्नब गोस्वामी यांच्या समर्थनात आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनात सहभागी झाले होते. दोन्ही नेत्यांना अटक केल्यानंतर पोलिसांनी त्यांना पोलीस स्थानकात नेण्यात आले आहे.(Tajinder Bagga Posters : अर्नब गोस्वामी यांच्या अटकेनंतर भाजपच्या तेजींदर बग्गा यांच्याकडून 'महाराष्ट्र सदन' इमारतीसमोर पोस्टरबाजी, 'आणीबाणी 0.2' असा उल्लेख)

अटकेपूर्वी कपिल मिश्रा यांनी गोस्वामी बद्दल असे म्हटले की, देशात पहिल्यांदाच असे झाले आहे की महाराष्ट्र सरकारला जाब विचारणाऱ्या एका पतरकाराला आणि परिवारातील सदस्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला गेला. आम्ही महाराष्ट्र सरकारकडून गोस्वामी यांच्यावर करण्यात आलेल्या अत्याचाराचा विरोध करतो. कारण त्यांनी चुकीच्या कायद्यांच्या अंतर्गत अटक केली आहे.(Arnab Goswami यांची तळोजा जेल मध्ये रवानगी; न्यायालयीन कोठडीत मोबाईल फोन वापरुन नियमांचे उल्लंघन)

दरम्यान, महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील अलिबाग पोलिसांनी गोस्वामी यांना इंटिरियर डिझाइनर अन्वय नाइक आणि त्याची आई 2018 मध्ये कथित रुपात आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करण्याप्रकरणी 4 नोव्हेंबरला लोअर परेल स्थित असलेल्या घरातून अटक केली होती. एका लोअर कोर्टाने त्यांना 18 नोव्हेंबरला न्यायालयिन कोठडी सुनावली आहे. गोस्वामी यांना सध्या एका स्थानिक शाळेत ठेवण्यात आले होते. त्यानंतर आता तळोजा तुरुंगात पाठवण्यात आले आहे.