Arnab Goswami | (Photo Credits: ANI)

वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी (Anvay Naik Suicide Case) अटकेत असलेले रिपब्लिक टीव्हीचे (Republic TV) मुख्य संपादक (Editor-in-Chief) अर्नब गोस्वामी (Arnab Goswami) यांची तळोजा जेल मध्ये रवानगी केली आहे. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, अटकेनंतर अर्नब यांना अलिबाग येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये (Alibaug Quarantine Centre) ठेवण्यात आलं होतं. मात्र तेथे त्यांनी मोबाईल फोनचा वापर केल्याने त्यांना आता तळोजा जेलमध्ये (Taloja Jail) हलवण्यात आलं आहे.

"न्यायालयीन कोठडीत पाठवल्यानंतर शुक्रवारी रात्री अर्नब गोस्वामी सोशल मीडियावर अॅक्टीव्ह झाल्याची बातमी आम्हाला मिळाली. दुसऱ्या व्यक्तीचा मोबाईल फोन वापरुन ते सोशल मीडियावर सक्रीय झाले होते. बुधवारी अटक केल्यानंतर आम्ही त्याचा पर्सनल मोबाईलही जप्त करण्यात आला होता. या प्रकरणाचा मी इंन्व्हेटीगेशन ऑफिसर असल्याने अलिबाग जेल सुपरिटेंडेंट यांना अर्नब गोस्वामी यांनी वापरलेल्या मोबाईलची चौकशी करण्यास सांगितले. त्यानंतर रविवारी सकाळी आम्ही अर्नब गोस्वामी यांना तळोजा जेल मध्ये हलवले," अशी माहिती रायगड गुन्हे विभागाचे इंन्व्हेटीगेशन ऑफिसर इंस्पेक्टर जमील शेख यांनी दिली आहे. (अर्नब गोस्वामी यांच्या अटकेनंतर भाजपच्या तेजींदर बग्गा यांच्याकडून 'महाराष्ट्र सदन' इमारतीसमोर पोस्टरबाजी, 'आणीबाणी 0.2' असा उल्लेख)

दोन वर्षापूर्वी आत्महत्या केलेल्या अन्वय नाईक प्रकरणात बुधवारी अर्नब गोस्वामी यांना पोलिसांनी अटक केली. त्यानंतर अलिबाग येथील क्वारंटाईन सेंटर म्हणून वापरण्यात येणाऱ्या पालिकेच्या शाळेत त्यांना ठेवण्यात आले होते. मात्र न्यायालयीन कोठडीत असताना मोबाईल फोनचा वापर केल्याने त्यांना आता तळोजा जेलमध्ये राहावे लागणार आहे. (Arnab Goswami allegations on Maharashtra Police: अटक करताना खरोखरच मारहाण? अर्नब गोस्वामी यांच्या आरोपांवर पोलिसांनी दिले स्पष्टीकरण)

दरम्यान,  "माझ्या जीवाला धोका आहे. मला माझ्या वकीलांशी बोलू दिले जात नाही. आज सकाळी मला धक्काबुक्की आणि मारहाण करण्यात आली," असे रिपल्बिक टीव्ही रिपोर्ट्सशी बोलताना अर्नब गोस्वामी यांनी पोलिस व्हॅनमधून सांगितले.