Delhi Nirbhaya Gang Rape Case: चारही आरोपींना फासावर लटकवले जाणार?
Delhi Nirbhaya Gang Rape Case (PC- Twitter)

Delhi Nirbhaya Gang Rape Case: हैदराबाद बलात्कार प्रकरणानंतर आता दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींना फासावर लटकवण्याच्या हालचालींना वेग आला आहे. या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यापूर्वी 'ट्रायल' कोर्टाकडून 'ब्लॅक वॉरंट' घ्यावे लागणार आहे. निर्भया बलात्कार आणि हत्याकांडातील चारही दोषींना 16 डिसेंबरला फासावर लटकवण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय गृह सचिव कार्यालयातील सूत्रांनी दिली आहे. तसेच निर्भया गँगरेप प्रकरणातील 4 दोषींपैकी एक असलेल्या पवनला मंडोलीच्या जेल क्रमांक 14 मधून तिहार कारागृहाच्या जेल क्रमांक 2 मध्ये हलवण्यात आलं आहे. या जेलमध्ये निर्भयाच्या 4 दोषींपैकी अक्षय आणि मुकेश हे दोघे कैद आहेत. तर विनय शर्मा जेल क्रमांक 4 मध्ये कैद आहे. (हेही वाचा - दिल्ली येथील निर्भया बलात्कार प्रकरणी आण्णा हजारे यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र)

निर्भया प्रकरणात पवन गुप्ता, मुकेश सिंह, अक्षय ठाकूर आणि विनय शर्मा दोषी आहेत. तसेच या प्रकरणातील राम सिंह नावाच्या आरोपीने तिहार तुरुंगातच आत्महत्या केली होती. तसेच यातील एक आरोपी अल्पवयीन असल्यामुळे न्यायालयाने त्याला 3 वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली होती. 2015 मध्ये या आरोपीची सुटका झाली होती.

हेही वाचा - Nirbhaya Case:'पोक्सोअंतर्गत दोषींना दया नकोच'- राष्ट्रपती रामनाथ कोविंद

Nirbhaya Rape And Murder: निर्भया सामूहिक बलात्कार आणि खून प्रकरणातील चारही दोषींना एकाच वेळी फाशी Watch Video 

निर्भया प्रकरणातील आरोपींच्या फाशीबाबत जेल प्रशासनाला आणखी कोणतंही पत्र मिळालेलं नाही. मात्र, प्रशासनाकडून फाशीची तयारी करण्यात आली आहे. तिहार जेलमध्ये या 4 आरोपींना फाशी देण्यापूर्वी एका डमीला फाशी देण्यात आली. यावेळी या डमीमध्ये 100 किलो वाळू भरण्यात आली. तसेच डमीला एक तास लटकवून ठेवण्यात आलं. आरोपींना फाशी दिल्यानंतर त्यांच्या वजनामुळे दोरी तुटणार तर नाही ना, हे पाहण्यासाठी हा आढावा घेण्यात आला.