Delhi News: स्वत:च्या आईच्या घरी चोरी, सोन्याचे दागिने चोरले;आरोपी महिलेला अटक
Theft Video PC twitter

Delhi Crime:  दिल्लीत द्वारका भागात एका महिलेने स्व:ताच्या आईच्या घरात चोरी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपी महिलेवर कर्ज असल्याने तीन चोरी केली.पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केले आहे. श्वेता (वय ३१) असं आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरातून आरोपींची ओळख पटवली.  महिलेने घरात तोडफोड करत चोरी केली. (हेही वाचा-  क्रिकेटच्या सामन्यात वाद; दगडाने ठेचून तरुणाची हत्या, तिघांवर गुन्हा दाखल)

मिळालेल्या माहितीनुसार, महिलेने स्व:ताचे आईच्या घरी चोरी केली. महिलेने सुमारे १३ लाख, साडेनऊ हजार रुपयांचे दागिने चोरले. द्वारका जिल्हा पोलिसांनी महिलेने अटक केली. घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली. महिलेने बुरखा घालून चोरी केल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. ३० जानेवारी रोजी विंदापूर पोलीस ठाण्यात घरात चोरी झाल्याची तक्रार मिळाली. घरात ठेवलेल्या कपाटातून तोडफोड न करता दागिने आणि रोख रक्कम चोरीला गेल्याचे पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी घटनास्थळावरून सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये घटनेच्या दिवशी बुरखा घातलेली एक महिला घराचा दरवाजा उघडून आत जाताना दिसली. पोलिसांनी चौकशी केली तेव्हा समजले की, महिला ही तक्रारदाराची मुलगी आहे. पोलिसांनी आरोपी श्वेताला ताब्यात घेतले आहे.

या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. श्वेताकडून पोलिसांनी १३ लाख, साडेनऊ ९ लाखाचे दागिने आणि बुरखा जप्त केले आहे. चौकशीत महिलेले गुन्ह्याची कबुली दिली आणि कर्ज फेडण्यासाठी चोरी केली होती. धाकट्या बहिणीच्या लग्नासाठी दागिने बनवले होते ते देखील चोरले.