Uttar Pradesh Crime:  क्रिकेटच्या सामन्यात वाद; दगडाने ठेचून तरुणाची हत्या, तिघांवर गुन्हा दाखल
Uttar Pradesh crime PC twitter

Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेशातील नोएडा येथे एका क्रिकेट सामन्यादरम्यान झालेला वाद अगदी टोका पर्यंत गेला आहे. भांडणात तिघांनी डोक्यात दगड मारल्याने एका 24 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यात घडली आहे. सुमित असं मृत मुलाचे नाव होते. सुमितच्या कुटुंबानी या प्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवला गेला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरु केला आहे. (हेही वाचा- गणपत गायकडवाडांच्या समर्थनार्थ कोर्टाबाहेर घोषणाबाजी, भाजपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल)

मिळालेल्या माहितीनुसार, क्रिकेटच्या सामान्यात सुमित आणि दुसऱ्या तरुणांमध्ये जोरदार वाद झाला. पोलिस उपायुक्त हिरदेश कथेरिया यांनी या प्रकरणी कारवाई सुरु केली आहे. काही तरुणांमध्ये क्रिकेट सामन्यादरम्यान वाद झाला होता. वाद टोकाला गेला आणि मारमारी चालू झाली. दरम्यान सुमित या मारमारीतून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता पण तो नाल्यात पडला आणि तिघांनी त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला. त्याच्या डोक्यावर दगडाने वार केला आणि तो गंभीर जखमी झाला. गंभीर जखमांमुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.

या प्रकरणी सुमितच्या कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार नोंदवला. या प्रकरणातील मुख्य आरोपी हिमांशू आणि इतर दोघांविरुद्ध बिसरख पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला असून सुमितचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली आहे.