Delhi Bomb Threats Update: दिल्ली-नोएडातील 80 शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी, तपास यंत्रणा सतर्क

Delhi Bomb Threats Update: दिल्ली-नोएडातील 80 शाळांना बॉम्बने उडवण्याच्या धमकीनंतर पोलीस-प्रशासन हाय अलर्टवर आहे. धार्मिक संस्थेकडून शाळांना मिळालेल्या ईमेलमध्ये भीतीदायक गोष्टी लिहिण्यात आल्या होत्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजधानीसह जवळपासच्या शेकडो शाळांमध्ये बॉम्ब ठेवण्यात आले असून ते लवकरच स्फोट होणार असल्याचे ईमेलमध्ये सांगण्यात आले आहे.

याप्रकरणी आता सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. दिल्ली पोलिसांच्या तपासात आतापर्यंत कोणतीही संशयास्पद वस्तू सापडलेली नाही. तथापि, IP पत्ता तपासताना रशियन भाषा आढळून आली आहे.

पाहा पोस्ट:

रशियाकडून धमकीचा ईमेल पाठवला गेला आहे का? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

अशा परिस्थितीत शाळांना मिळालेला धमकीचा ईमेल रशियातून पाठवण्यात आल्याचा संशय आहे. ईमेल पाठवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या आयपी ॲड्रेसचा सर्व्हर परदेशात असल्याचा संशयही तपास यंत्रणांना आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ईमेल पाठवण्यासाठी फक्त एक आयपी ॲड्रेस वापरण्यात आला आहे.

सध्या दिल्ली, नोएडा आणि गाझियाबाद पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा संयुक्तपणे तपास करत आहेत. ही घटना लवकरच उघडकीस येण्याची शक्यता आहे.