
भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी रविवारी एका सभेत दहशतवाद्यांच्या विरोधात विधान केले आहे. भारतीय संविधानातून अनुच्छेद 370 (Artical 370) रद्द केल्यापासून भारत (India) आणि पाकिस्तानात (pakistan) तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. भारताच्या अंतर्गत मुद्यात पाकिस्तान अनेकदा हस्तक्षेप करत आल्याचे दिसून आले आहे. पाकिस्तानाकडून अनेकदा भारतात भ्याड हल्ला घडवले गेले आहेत. पाकिस्तानने अशा प्रकारच्या कुरापतींना पूर्णविराम द्यावा, या उद्देशाने राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला सावधनीचा इशारा दिला आहे. अन्यथा पाकिस्तान किती दहशतवादी पाठवू शकतो ते पाहुया. परंतु, भारतात आलेला एकही दहशतवादी पाकिस्तानात परत जाऊ शकणार नाही, असे राजनाथ सिंह यांनी पटना (Patna) येथील कार्यक्रमात म्हणाले आहेत. दरम्यान भारताचे पंतप्रधान नरेद्र मोदीं (Narendra Modi) यांच्या कामगिरीचेही राजनाथ सिंह यांनी तोंडभरून कौतुक केले आहे.
भाजप पक्षाने रविवारी बिहार येथील मेमोरियल हॉलमध्ये 'जन-जागरण-सभा' आयोजित केली होती. या दरम्यान, राजनाथ सिंह यांनी त्यांच्या भाषणातून पाकिस्तानला खडेबोल सुनावले आहेत. या कार्यक्रमात राजनाथ सिंह म्हणाले की, "अनुच्छेद 370 हा संविधानावर ओझे होते, ते भाजपने कमी केले आहे. पाकिस्तान 1965 आणि 1971 यांसारखी पुन्हा चूक करणार नाहीत, अशी इच्छा व्यक्त करतो. लोक म्हणतात की, आपण स्वप्न पाहतो पण ते खरे होत नाही. पण आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिलेले स्वप्न साकार करुन दाखवले. त्यांनी हे सिद्ध केले आहे की, आपण उघड्या डोळ्यांनी स्वप्ने पाहतो म्हणून आपली स्वप्ने साकार होतात." हे देखील वाचा-महाराष्ट्रात भाजपची पूर्ण बहुमताने सत्ता येणार,निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री: अमित शाह
जम्मू काश्मीरला विशेष राज्याच्या दर्जा देणारे अनुच्छेद 370 समानतेच्या विरोधात होते. भारतीय जनता पक्षाने अनुच्छेद 370 रद्द करुन योग्यच निर्णय घेतला आहे. यापुढे जर पाकिस्तान चुकीच्या मार्गाने चालला तर, त्याचे वाईट परिणाम होतील. तसेच भारताला नरेंद्र मोदी यांच्या रुपात एक आक्रमक आणि कर्तव्यशील पंतप्रधान मिळाले आहेत, असे राजनाथ सिंह यांच्या बोलण्यातून स्पष्ट होते.