Uttar Pradesh Shocker: उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) मुझफ्पनगर जिल्ह्यात एका दलित तरुणाला बेदम मारहाण (Beaten) करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पीडित दलित तरुणाचे राहत्या गावातील एका वेगळ्या जातीतील विवाहित महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून मारहाण केले आहे.जीवघेण्या मारहाणीत तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली आहे. (हेही वाचा- तेलंगणात पैसे न दिल्याने मुलाचा आईवर हल्ला, महिलेचा मृत्यू)
मिळालेल्या माहितीनुसार, खतौली परिसरातील जसौला गावात ही घटना घडली आहे. अंकीत कुमार असं या घटनेत मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. अंकीत गेल्या काही महिन्यांपासून ३० वर्षीय महिलेच्या प्रेमात पडला होता. या घटनेची माहिती गावात कळताच, गावकऱ्यांनी हातपाय बांधून त्याला मारहाण केली. घटनेच्या दिवशी कुमार हातापाय बांधलेल्या अवस्थेत आढळून आला. मारहाणीत तो गंभीर जखमी झाला आणि त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल केले. उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
या घटनेअंतर्गत पोलिसांनी महिलेचा पती आणि गावातील इतर काही स्थानिकांना ताब्यात घेतले. खतौली पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. आयपीसी कलम ३०२ हत्या कायद्यांतर्गत व्यक्तींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून अहवालाची प्रतिक्षा आहे अशी माहिती पोलिसांनी दिली. प्राथमिक तपास सुरु आहे. मृताच्या भावाने तक्रारी सांगितले की, गावकऱ्यांनी कुमारला हातपाय बांधून रात्रभर मारहाण केली. त्याच्या गळात स्कार्फ देखील होता. शरिरावर भरपूर जखमा होत्या.