Cylinder Explode in Jodhpur: जोधपूर (Jodhpur) च्या शेरगड भागातील भुंगरा गावात लग्न समारंभात (Marriage Ceremony) सिलिंडरचा स्फोट (Cylinder Blast) झाल्याने आनंदाचे रूपांतर काही क्षणातच शोकात झाले. गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत लग्नाच्या मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी आलेले 60 हून अधिक जण जखमी झाले. या अपघातात आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे. गंभीर भाजलेल्या 51 जणांना जोधपूरच्या महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे उपचारादरम्यान दोन निष्पापांचा मृत्यू झाला. त्याचबरोबर या अपघातात 10 हून अधिक लोक 80 टक्क्यांहून अधिक भाजले असून ते जीवन आणि मृत्यू यांच्यात संघर्ष करत आहेत.
अपघाताची माहिती देताना जिल्हा दंडाधिकारी हिमांशू गुप्ता यांनी सांगितले की, आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी हिमांशू गुप्ता ग्रामीण एसपी अनिल कायल शेरगडच्या भुंगरा गावात पोहोचले. त्यानंतर जोधपूरला पोहोचल्यानंतर त्यांनी सर्व जळालेल्या लोकांना तत्काळ रुग्णालयात पाठवले. शेरगड पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने 2 सिलिंडरचा स्फोट झाल्याची पुष्टी केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला असून जिल्हाधिकाऱ्यांना याप्रकरणी संपूर्ण व्यवस्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. (हेही वाचा - Cylinder Blast in Ghaziabad: गाझियाबादमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने घर कोसळून 2 मुलांसह तीन जणांचा मृत्यू; बचाव कार्य सुरू)
स्थानिक पातळीवर मिळालेल्या माहितीनुसार, भुंगरा येथील रहिवासी सगतसिंग गोगादेव यांच्या मुलाचे गुरुवारी लग्न होणार होते. हे सर्व लोक वरात काढण्यासाठी गावात जमले होते. तिथे जेवणापूर्वी सिलेंडरमधून गॅस गळतीमुळे स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की घराचे छतही कोसळले. सिलिंडरचा स्फोट होऊन झालेल्या आगीत महिला आणि लहान मुलांसह उपस्थित 60 हून अधिक लोक भाजले.
घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकाऱ्यांनी जोधपूरच्या महात्मा गांधी हॉस्पिटलला निर्देश दिले. त्यांनी घटनास्थळावरून गंभीर जखमींना जोधपूरला पाठवले. खासगी वाहने आणि 108 रुग्णवाहिकेने अनेक फेऱ्या करून जखमींना जोधपूरला नेण्यात आले, तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच आरसीएचे अध्यक्ष वैभव गेहलोत, शेरगडच्या आमदार मीना कंवर यांच्यासह अनेकजण रुग्णालयात पोहोचले. या घटनेनंतर गावातील वातावरण शोकाकुल झाले आहे. (हेही वाचा - Mumbai Cylinder Blast: वेस्टर्न एक्सप्रेस हायवे परिसरात सिलेंडरचा भीषण स्फोट, दुर्घटनेत पाच जण गंभीर जखमी)
Jodhpur, Rajasthan | Around 60 people injured after a house caught fire during a wedding in Bhungra village
It's a very serious accident. 42 people out of the 60 injured were referred to MGH hospital. Treatment is going on: Himanshu Gupta, District Collector (08.12) pic.twitter.com/9DYKOeHFrE
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) December 9, 2022
जोधपूरमध्ये गेल्या 2 महिन्यांत सिलेंडर स्फोटाची ही दुसरी घटना आहे. ज्यात मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाली आहे. याआधी 8 ऑक्टोबरला जोधपूरच्या कीर्ती नगर भागात गॅस रिफिल करताना स्फोट झाला होता, ज्यामध्ये 15 हून अधिक लोक भाजले होते आणि 5 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला होता.