Coronavirus Worldometer Tracker: वर्ल्डोमीटर ट्रॅकरनुसार भारतात कोरोना रुग्णांच्या संख्येने पार केला 5 लाखांचा टप्पा
Coronavirus (Photo Credits: Pixabay)

चीनच्या प्राणघातक कोरोना व्हायरसने (Coronavirus) जगभरातील सर्व देशांमध्ये हैदोस घातला आहे. या विषाणूने आतापर्यंत लाखो लोकांचे प्राण घेतले आहे. इतर देशांप्रमाणे भारतात (India) देखील कोरोना विषाणूचे प्रमाण वाढत आहे. कोरोना वर्ल्डोमीटर ट्रॅकरनुसार (Coronavirus Worldometer Tracker) देशात कोरोना विषाणूचा कहर इतका वाढला आहे की संक्रमित रूग्णांची संख्या पाच लाखांच्या वर पोहचली आहे. याच बरोबर देशात एका दिवसात महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक बाधित पाच हजाराहून अधिक कोरोनाच्या रुग्णांची पुष्टी झाली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या अधिकृत आकडेवारीनुसार आज सकाळपर्यंत देशात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या 490,401 होती. देशात कोरोना विषाणूमुळे महाराष्ट्र (Maharashtra), दिल्ली (Delhi) आणि तामिळनाडू या सर्वाधिक प्रभावित राज्यांची ताजी आकडेवारी जर जोडली गेली तर देशात कोरोना रुग्णांची संख्या पाच लाखांच्या पार पोहचली आहे. यासह अमेरिका, ब्राझील, रशियानंतर कोरोनामुळे सर्वाधिक प्रभाव होणार भारत चौथा मोठा देश बनला आहे. (COVID19 Updates In Maharashtra: महाराष्ट्रात आजपर्यंतची सर्वाधिक 5 हजार 24 नव्या कोरोनाबाधितांची नोंद; 175 जणांचा मृत्यू)

www.worldometers च्या म्हणण्यानुसार आता भारतात कोरोना रुग्णांची संख्या 5 लाखांपेक्षा जास्त आहे. महाराष्ट्रात आज 5024 तर दिल्लीमध्ये 3460 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्याशिवाय तामिळनाडूमध्ये 3645 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. तथापि, आरोग्य मंत्रालयामार्फत देशातील एकूण कोरोना रूग्णांची अधिकृत माहितीदुसर्‍याच दिवशी जाहीर केली जाईल. दुसरीकडे, अमेरिकेत सर्वाधिक 2,527,025 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यांनतर ब्राझीलमध्ये 1,244,419, आणि रशियामध्ये 620,794 रुग्ण कोरोनाबाधित झाले आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात आज तब्बल 5024 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे, तर 175 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 91 मृत्यू मागील 48 तासांमधील तर उर्वरित 84 मागील कालावधीतील आहे. यासह राज्यातील कोरोनाबाधितांची आता संख्या 1,52,741 वर पोहचली आहे. यापैकी 79,815 रुग्णांनी यशस्वीपणे कोरोनावर मात केली आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत अधिक वाढ होऊ लागल्याने सर्वत्र चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत.