महाराष्ट्रात (Maharashtra) आज तब्बल 5 हजार 24 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 175 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 91 मृत्यू मागील 48 तासांमधील तर, उर्वरित 84 मागील कालावधीतील आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची (Coronavirus) संख्या 1 लाख 52 हजार 741 वर पोहचली आहे. यापैकी 79 हजार 815 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत अधिक वाढ होऊ लागल्याने सर्वत्र चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून ठोस पाऊले उचलली जात आहेत.
महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान, कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून अनेक कठोर पावले उचलली जात आहेत. सध्या महाराष्ट्रात कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येतही वाढ होत असल्याचे समजत आहे. सध्या भारतात एकूण 4 लाख 90 हजार 401 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी 15 हजार 301 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 2 लाख 85 हजार 637 जण कोरोनामुक्त झाले आहेत. हे देखील वाचा- मुंबई: धारावीत आज कोरोना व्हायरसचे आणखी 8 रुग्ण आढळून आल्याने आकडा 2218 वर पोहचला, महापालिकेची माहिती
एएनआयचे ट्विट-
Maharashtra reports 175 deaths and 5024 new #COVID19 positive cases. Out of the total 175 deaths, 91 deaths are of last 48 hours and 84 deaths are of previous dates but recorded today. There are 65,829 active cases in the State: State Health Department
— ANI (@ANI) June 26, 2020
महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत आहे. याचदरम्यान, राज्यातील नागरिकांच्या चिंतेत भर टाकणारी माहिती समोर आली आहे. राज्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्यात कोरोनाबाधित रुग्णांमध्ये प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे. परंतु मृत्यूदर वाढू नये यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याचसोबत डॉक्टरांसह आयसीयू बेड्सची क्षमता सुद्धा वाढवण्यात येत आहे, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले आहेत.