कोरोना व्हायरस (Coronavirus) लॉकडाउनमुळे (Lockdown) परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत करण्यासाठी 'वंदे भारत मिशन'चा (Vande Bharat Mission) दुसरा टप्पा 15 मेपासून सुरू होणार आहे. न्यूज एजन्सी एएनआयने शेअर केलेल्या ट्विटनुसार रशिया, जर्मनी, थायलंड, फ्रान्स, स्पेन, उझबेकिस्तान आणि कझाकस्तान सारख्या इतर देशांतून भारतीयांना या दरम्यान स्वदेशी परत आणले जाईल. यात फीडर उड्डाणे देखील असतील. युएई आणि सिंगापूर येथून आतापर्यंत अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी भारताने आपल्या नौदल जहाज आणि एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानं सुरु केली आहेत. लॉकडाउनमुळे संयुक्त अरब अमिरातीत अडकलेल्या 360 हून अधिक भारतीयांना मायदेशी परत आणले आहेत. गुरुवार रात्री एअर इंडियाची दोन स्पेशल विमाने प्रवाशांना घेऊन अबू धाबी आणि दुबईहून केरळला पोहचले. शिवाय, लॉकडाउनमुळे काही दिवसांपासून सिंगापूरमध्ये अडकलेले भारतीय देखील अखेर मायदेशी परतले आहेत. (Vande Bharat Mission: लॉकडाउनमुळे अबूधाबीला अडकलेल्या भारतीयांना घेऊन एअर इंडियाचे पहिले विमान कोचीला उतरले)
भारत सरकारने परदेशात अडकलेल्या भारतीयांना मायदेशात परत आणण्यासाठी ‘वंदे भारत मिशन’ सुरू केले आहे. या योजनेनुसार विमान आणि नौसेनेच्या जहाजातून परत आणले जात आहे. दरम्यान, एएनआयने सूत्रांच्या हवालयातून म्हटले की, "आत्तापर्यंत, एकूण 67,833 विनंत्या स्वदेशी परत येण्यासाठी नोंदल्या गेल्या आहेत, ज्यात विद्यार्थी, स्थलांतरित कामगार, अल्प मुदतीचे व्हिसा धारक आहे, जे वैद्यकीय आपत्कालीन स्थितीत आहेत किंवा टर्मिनल आजारावर उपचार घेत आहेत इत्यादींचा समावेश आहे."
India will be expanding scope of countries in the next week of repatriation i.e. May 15. Indians will be repatriated from other countries like Russia, Germany, Thailand, France, Spain, Uzbekistan & Kazakhstan: Sources #VandeBharatMission
— ANI (@ANI) May 8, 2020
Vande Bharat Mission: अबूधाबीला अडकलेल्या १८१ भारतीयांना घेऊन पहिल विमान कोचीला दाखल - Watch Video
सध्या 12 देशांमधून अडकलेल्या सुमारे 15,000 भारतीयांना परत आणण्यासाठी केंद्राने 7 मे ते 13 मे या कालावधीत 64 एअर इंडिया उड्डाणे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या दरम्यान, अमेरिका, संयुक्त अरब अमिराती, युनायटेड किंगडम, बांग्लादेश, बहरीन, कुवैत, सिंगापूर, मलेशिया, फिलिपिन्स, ओमान, कतार आणि सौदी अरेबियामध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले जाणार आहे. यासाठी प्रवाशांकडून शुल्क आकारले जात आहे. कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी 25 मार्चपासून भारत लॉकडाउनमध्ये आहे. या कालावधीसाठी सर्व व्यावसायिक प्रवासी उड्डाणे निलंबित करण्यात आली आहेत.भारतात लॉकडाऊनचा पहिला आणि दुसरा टप्पा अनुक्रमे 25 मार्च ते 14 एप्रिल आणि 15 एप्रिल ते 3 मे दरम्यान होता. 7 तिसरा टप्पा 4 मेपासून सुरू झाला आणि 17 मे रोजी संपणार आहे.