(Photo Credit: ANI)

कोरोना व्हायरसमुळे (Coronairus) लॉकडाऊन दरम्यान विदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्याची प्रक्रिया 'वंदे भारत मिशन' (Vande Bharat Mission) अंतर्गत सुरु झाली आहे. गुरुवारी 7 मे रोजी सुरू करण्यात आलेल्या वंद भारत मिशन अंतर्गत संयुक्त अरब अमिरातीच्या (यूएई) अबू धाबीहून (Abu Dhabi) पहिले उड्डाण केरळमध्ये (Keral) दाखल झाले. मिळालेल्या माहितीनुसार या विमानात 177 भारतीय नागरिक आहेत, ज्यामध्ये 49 गर्भवती महिलांचा समावेश आहे. आता या प्रवाश्यांना क्वारंटाइनमध्ये ठेवण्याची व्यवस्था केली जाणार आहे. आतापर्यंत भारताकडून 30 पेक्षा जास्त वेळा विमानवाहतूक ऑपरेशन करण्यात आले आहेत. वंदे भारत मिशन अंतर्गत परदेशात लॉकडाउनमुळे अडकलेल्या भारतीयांना समुद्राद्वारेही आणण्याची तयारी सुरू आहे. ज्या नागरिकांना परदेशातून भारतात आणले जाईल त्यांना घरी जाण्यापूर्वी 14 दिवस क्वारंटाइनमध्ये ठेवले जाणार असल्याचे सरकारकडून यापूर्वीच हे स्पष्ट केले गेले आहे. (लॉकडाऊनमुळे अमेरिकेत अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परतण्यासाठी 9-15 मे दरम्यान एअर इंडियाची विशेष उड्डाणे; भारतीय दूतावासाने जारी केली Travel Advisory)

परदेशात कोरोना व्हायरसमुळे अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी 'वंदे भारत मिशन' सुरू करण्यात आला आहे. या मोहिमेअंतर्गत पहिल्या आठवड्यात 12 देशांतील 15 हजाराहून अधिक लोकांना भारतात आणले जाईल. यापूर्वी झालेल्या बचाव कार्यापेक्षा हे अभियान पूर्णपणे भिन्न आणि मोठे आहे. या अभियानांतर्गत हजारो 64 उड्डाणे आणि नौदल युद्धनौका भारतीयांना घेऊन मायदेशी परततील.

भारतात कोरोना व्हायरसचे थैमान सुरूच आहे. देशात या व्हायरसची लागण झालेल्या लोकांची संख्या 52 हजार 952 झाली आहे. यापैकी 35 हजार 9 सौ 2 रुग्ण अद्याप सक्रिय आहेत आणि 1783 लोक मरण पावले आहेत. देशातील जनतेला दिलासा देणारी बातमी अशी म्हणजे या प्राणघातक विषाणूमुळे 15 हजार 267 लोक पूर्णपणे बरे झाले आहेत. दुसरीकडे, जगभरात या व्हायरसमुळे 2 लाख 64 हजार लोक मरण पावले आहेत. या विषाणूचा परिणाम अमेरिकामध्ये दिसून येत आहे. अमेरिकेत 74 हजार 665 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 1 लाख 71 हजारांहून अधिक लोक बरे झाले आहेत.