Coronavirus Scare (Photo Credits: IANS)

कोरोना व्हायरसने (Coronavirus) चीनसह संपूर्ण जगभरात थैमान घातले असून सर्वत्र भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत 3 हजार लोकांनी आपला जीव गमावावा लागला आहे, तर एकूण 88 हजार लोकांना याची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. भारतात गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना व्हायरसचे 3 रुग्ण आढळले होते. चीनहून भारतात परतलेले पहिले 3 रुग्ण नुकतेच बरे होऊन काहीच दिवस उलटले असताना पुन्हा दिल्ली (Delhi) आणि तेलंगणा (Telangana) येथे कोरोना व्हायरचे प्रत्येकी एक रूग्ण सापडल्याचे समजत आहे. यामुळे देशात पुन्हा भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे. या दोन्ही रुग्णांना निरिक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. कोरोना व्हायरसपासून मुक्तता व्हावी, यासाठी जगभरातून प्रयत्न केले जात आहे.

चीनमधील वुहान शहरात गेल्या महिन्याभरापासून थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसने अक्षरश: लोकांना हैराण केले आहे. चीनच्या वुहान येथे 30 डिसेंबर 2019 मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यांनंतर संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरसचा रुग्ण आढळू लागले आहेत. भारतात गेल्याकाही दिवसांपूर्वी केरळ येथे कोरोना व्हायरस संक्रमित 3 रुग्ण आढळले होते. या तिघांवर योग्य उपचार करून त्यांना वाचवण्यात भारतीय डॉक्टरांना यश आले होते. या तिन्ही रुग्णाला बरे होऊन काहीच दिवस उलटले नसताना पुन्हा कोरोना व्हायरचा आणखी 2 रुग्ण आढळल्याचे समोर आले आहे. एक दिल्लीत तर, दुसरा रुग्ण तेलंगणा येथे सापडला आहे. या दोघांनाही निगराणीखाली ठेवण्यात आली असून प्रशासनाने नागरिकांना दक्षता बाळगण्याचे आवाहन केले आहे. ही माहिती कळताच दिल्लीसह तेलंगणा येथील नागरिकांच्यासमोर मोठे संकट उभे राहिल्याचे चिन्ह दिसत आहे. हे देखील वाचा- Coronavirus Outbreak: जगभरात COVID-19 ने घेतले 3000 बळी; 88,000 जणांना लागण

ट्वीट-

डॉक्टरांचे म्हणणे आहे की, कोरोना व्हायरसमुळे संक्रमित असलेल्या व्यक्तीच्या खोकला, शिंगणे, हस्तांदोलन करणे किंवा मल-मूत्राच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना सुद्धा हे संक्रमण होऊ शकते. म्हणून व्हायरसने संक्रमित झालेल्या व्यक्तींना एकाच ठिकाणी ठेवले जाणे आवश्यक आहे. डॉक्टरांनी सर्दी-खोकला आणि ताप असलेल्या व्यक्तींना आपल्या घरातच राहण्याचा सल्ला दिला आहे. जेणेकरून त्यांना या व्हायरसचे संक्रमण होणार नाही आणि इतर कुणालाही याचा त्रास होणार नाही.