Milk Product: महागाईचा परिणाम! आता दुधासह सर्व दुग्धजन्य पदार्थ महाग होण्याची शक्यता
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य- ट्विटर)

देशातील महागाईचा परिणाम (Consequences Of Inflation) आता दुधाच्या (Milk) दरावरही दिसून येणार आहे. डेअरी कंपन्या लवकरच दर वाढवू शकतात. अलीकडे जागतिक स्तरावर स्किम्ड मिल्क पावडर तसेच पशुखाद्याचे दर वाढले आहेत. आयसीआयसीआय सिक्युरिटीजच्या तज्ज्ञांनी शुक्रवारी सांगितले की चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत किंमती वाढू शकतात. तज्ञ म्हणतात, “आमच्या कव्हरेज अंतर्गत, सर्व डेअरी कंपन्या किंमती 5% ते 8% पर्यंत वाढवू शकतात. त्यामुळे दुधाचे वाढते दर हा चिंतेचा विषय आहे. तसेच सर्व डेअरी कंपन्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत किमती वाढवण्याची शक्यता आहे.

विश्लेषकांनी सांगितले की, गेल्या काही वर्षांत घरांसोबतच हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स मोठ्याप्रमाने वाढल्यामुळे दुधाची मागणी झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे दुधाचे दर वाढले आहेत. जनावरांच्या चाऱ्याच्या किमतीत झालेली वाढ आणि उष्णतेमुळे दूध उत्पादनात झालेली घट याचाही भावावर परिणाम झाल्याचे त्यांनी सांगितले. परिणामी घाऊक दुधाचे दर वर्षानुवर्षे वाढतच आहेत. उदाहरणार्थ, अखिल भारतीय पातळीवर जूनमध्ये घाऊक दुधाच्या किमती 5.8% ने वाढल्या होत्या. दक्षिण भारतात दुधाचे दर वर्षाला 3.4% वाढले आहेत. (हे देखील वाचा: Home Loan Interest Rates Hike: PNB, ICICI, BoB, BOI ने वाढवले गृहकर्जाचे व्याजदर; तुमच्या EMI वर होणार थेट परिणाम, येथे जाणून घ्या नवीन दर)

निर्यात वाढल्याने दूध होणार महाग

दैनंदिन वस्तूंच्या किमती वाढल्याने जनतेला महागाईचा सामना करावा लागत आहे. कंपन्यांना कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमतीचाही सामना करावा लागत आहे. उदाहरणार्थ, जागतिक स्किम्ड मिल्क पावडरच्या किमती गेल्या 12 महिन्यांत सातत्याने वाढल्या आहेत, जूनमध्ये वर्ष-दर-वर्ष 26.3% आणि महिन्या-दर-महिन्यात 3% वाढ झाली आहे. तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की आकर्षक निर्यात संधी भारतीय दूध उद्योगातील मागणी-पुरवठा समीकरण बिघडू शकतात.